-
केशर हा जगातील सर्वात महाग मसाल्याचा पदार्थ आहे. लहानपणी सणासुदीच्या वेळी श्रीखंडात किंवा मसाला दुधात केशराचा वापर केला जात असे. परंतु हल्ली अनेक पदार्थांमध्ये केशर वापरले जाते.
-
१ किलो केशराची किंमत लाखांच्या घरात आहे. केशरच्या उच्च किमतीचे कारण म्हणजे त्याची श्रमप्रधान कापणी पद्धत.
-
पक्वानांमध्ये केशर सुगंध आणि चवीसाठी घातले जाते पण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. केशर मनाला आणि बुद्धीला उत्तेजन देणारे असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचे जरूर सेवन करावे. केशरमुळे मनावरचा ताण कमी होऊन मेंदूचे आरोग्य सुधारते. शिकण्याची क्षमता वाढवते.
-
गरोदर महिलांना बाळाच्या वाढीसाठीसुद्धा ते उपयुक्त आहे. ते स्तनदा मातेचे दूध वाढवते.
-
केशर सौंदर्यवर्धक असल्यामुळे त्याचा प्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
-
केशरमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटीकॅन्सर फायदे असू शकतात. परंतु त्याचा अतिरेक टाळला पाहिजे.
-
केशरचे महत्वाचे प्रभावी आरोग्य फायदे जाणून घ्या.
-
केशरमध्ये वनस्पती संयुगांची प्रभावी विविधता असते. हे अँटीऑक्सिडंट्स म्हणून कार्य करतात. यातील रेणु आपल्या पेशींना मुक्त रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतात.
-
केशरचे सेवन केल्याने मूड सुधारू शकतो आणि औदासिन्याच्या लक्षणांवर उपचार करू शकतो. केशर हा नैराश्यावरचा पारंपारिक उपचार आहे.
-
केशरामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. ते हानिकारक मुक्त रॅडिकल्सला निष्प्रभ करायला मदत करते. केशर आणि त्याची संयुगे मोठ्या आतड्याच्या कर्करोगाच्या पेशी निवडकपणे नष्ट करतात किंवा त्यांची वाढ रोखतात.
-
हे निरोगी पेशींना हानी पोहोचवत नाहीत. हा प्रभाव त्वचा, अस्थिमज्जा, प्रोस्टेट, फुफ्फुस, स्तन, गर्भाशय ग्रीवा आणि इतर अनेक कर्करोगाच्या पेशींवर देखील लागू होतो.
-
प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम (पीएमएस) म्हणजे मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी उद्भवणारी शारीरिक, भावनिक आणि मानसिक लक्षणे. २०-४५ वर्षे वयोगटातील स्त्रियांमध्ये, चिडचिडेपणा, डोकेदुखी आणि वेदना यासारख्या पीएमएस लक्षणांवर उपचार करण्यासाठी प्लेसबोपेक्षा दररोज ३० मिलीग्राम केशर घेणे अधिक प्रभावी होते.
-
केवळ २० मिनिटांसाठी केशराचा वास घेतल्याने चिंता आणि तणाव कमी होऊन पीएमएसची लक्षणे कमी होण्यास मदत होते.
-
केशर कामोत्तेजक म्हणून कार्य करू शकते. नैराश्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन असलेल्या पुरुषांमध्ये प्लेसबोपेक्षा दररोज ३० मिलीग्राम केशर घेतल्यास इरेक्टाइल फंक्शनमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते.
-
दररोज ३० मिलीग्राम केशर घेतल्यास स्त्रियांमध्ये सुद्धा पुरुषांशी संबंध करण्याची लैंगिक इच्छा वाढवतात व वेदना कमी होतात.
-
केशर आपली भूक कमी करून स्नॅकिंग रोखण्यास मदत करू शकते. केशर पूरक आहार घेतल्यास पोट भरलेले वाटते आणि वजन कमी होते.
-
केशराचे अँटीऑक्सिडेंट गुणधर्म रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात आणि रक्तवाहिन्या बंद होण्यापासून रोखू शकतात.
-
केशर रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते आणि याचे सेवन मधुमेहावरील रामबाण उपाय ठरू शकते.
-
केशर एएमडी असलेल्या प्रौढांमध्ये दृष्टी सुधारते.
-
केशराचे अँटीऑक्सिडेंट गुणधर्म अल्झायमर रोग असलेल्या प्रौढांमध्ये आकलन सुधारू शकतात.
-
आहार म्हणून, दररोज १.५ ग्रॅम केशर सुरक्षितपणे घेऊ शकतो परंतु दररोज केवळ ३० मिलीग्राम केशर आरोग्यासाठी फायदे मिळविण्यासाठी पुरेसे आहे.
-
जास्त केशर घेतल्यास तोंड कोरडे पडणे, सुन्न होणे, हाताला मुंग्या येणे, डोकेदुखी आणि उलट्या होणे अशा समस्याही उद्भवू शकतात.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…