-
‘अन्न हे पूर्णब्रह्म’ आहे असे अनेकदा म्हटले जाते.अन्नाचे सेवन केल्यानंतर त्याचे शारीरिक घटकद्रव्यात व शक्तीत रुपांतर व्हावे ही प्रत्येकाची अपेक्षा असते, त्यामुळे आपण योग्य अन्नाचे सेवन करतोय का? अन्न नीट व योग्य पद्धतीने शिजवतोय का? हेसुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
निरोगी आणि चांगल्या दर्जाचे अन्न यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांनी अलीकडेच दहा “गोल्डन रुल्स” जाहीर केले आहेत. त्यातील दोन रुल्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
या दहा गोल्डन रुल्समधील एक महत्त्वाचा नियम म्हणजे ‘शक्य तितक्या लवकर शिजवलेले अन्न खाणे.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
दुसरा गोल्डन नियम म्हणजे ‘निरोगी आणि चांगल्या दर्जासाठी उरलेले अन्न ‘फक्त एकदाचं’ गरम करण्याचे महत्त्व अधोरेखित केलं आहे’. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर यासंबंधित अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समधील अंतर्गत वरिष्ठ सल्लागार डॉक्टर सुरंजित चॅटर्जी यांच्याशी संवाद साधला. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
डॉक्टरांच्या मते, किमान 75°C (165°F) च्या तापमानात अन्न पुन्हा गरम केल्याने बंद डब्यात किंवा एखाद्या भांड्यात ठेवलेल्या अन्नात निर्माण झालेल्या कोणत्याही जीवाणूंना मारण्यास मदत करू शकते. पण, त्यांनी चेतावणी दिली की, ही प्रक्रिया फक्त ‘एकदाच’ केली पाहिजे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
शिळे अन्न खाल्ल्यामुळे किंवा जास्त वेळा आणि चुकीच्या पद्धतीने अन्न सतत गरम केल्यामुळे मळमळ, उलट्या आणि अतिसार आदी लक्षणे उद्भवू शकतात आणि विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांसाठी धोकादायक असू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
डॉक्टर म्हणतात की, अन्न पुन्हा गरम करताना पुढील काही मार्गांचा तुम्ही वापर करून पाहू शकता…(फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. थोडं पाणी घाला – उरलेले अन्न पुन्हा गरम करताना कोरडे होऊ शकतात. तर यावेळेस थोडं पाणी किंवा सॉस घातल्याने अन्नातील ओलावा आणि चव टिकून राहण्यास मदत होते.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. अन्नाचे विभाजन करा – तुम्हाला अन्न गरम करायचे असल्यास त्याचे पहिले काळजीपूर्वक विभाजन करून घ्या. एकाचवेळी जास्त प्रमाणात अन्न गरम केल्यास त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.(फोटो सौजन्य: @Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”