-
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. हिना खानला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर आहे. स्तनाच्या कर्करोगाचा संबंध अनेकदा घट्ट ब्राशी जोडला जातो. यात काही तथ्य आहे का हे आपण जाणून घेऊया. (Hina Khan/Instagram)
-
स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा धोकादायक आणि गंभीर आजार आहे. हा आजार असणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
-
अनेकांना असे वाटते की घट्ट ब्रा घातल्याने स्तनाचा आकार वाढतो. याशिवाय स्तनाच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो.
-
ब्रा घालणे किंवा न घालणे याचा स्तनाचा कर्करोग होण्याही कोणताही विशिष्ट संबंध नाही. याबाबत कोणत्याही संशोधनात ठोस पुरावे मिळालेले नाहीत.
-
मात्र काही संशोधनात हे देखील आढळून आले आहे की अंडरवायर ब्रा लिम्फमधील रक्त परिसंचरणात अडथळा आणू शकते आणि यामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. ब्रा घालून झोपायचे की नाही हा वैयक्तिक निर्णय आहे.
-
अंडरवायर ब्रा किंवा खूप घट्ट ब्रा घातल्याने स्तनातील लिम्फच्या रक्ताभिसरणात अडथळा येतो. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो. मात्र याबाबत कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.
-
काळी ब्रा घातल्याने स्तनाचा कर्करोग होतो असाही एक समज आहे. मात्र ‘हेल्थ एज्युकेशन ऑर्गनायझेशन’च्या अहवालानुसार काळ्या ब्राचा ब्रेस्ट कॅन्सरशी कोणताही संबंध नसून या सर्व गोष्टी केवळ अफवा आहेत.
-
खराब आहार, लठ्ठपणा आणि वाईट जीवनशैली याशिवाय अनुवांशिक कारणांमुळेही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. रेडिएशन आणि जास्त मद्यपानामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
-
गरोदरपणातही महिला स्तनाच्या कर्करोगाच्या बळी ठरतात. केवळ वाढत्या वयामुळेच स्तनाचा कर्करोग होत नाही तर हा आजार लहान वयातही होऊ शकतो. त्यामुळे सर्व वयोगटातील महिलांनी सावध राहण्याची गरज आहे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (All Photos : Freepik)

Pahalgam Terror Attack : ‘नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीशी खोटं बोललो’, एटीव्ही ऑपरेटरने सांगितली आठवण; पाहा Video