-
प्रत्येक ऋतूनुसार आपल्या सगळ्यांनाच दैनंदिन जीवनात बदल करावे लागतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पावसाळा कडक उष्णतेपासून आराम देत असला तरीही या ऋतू आर्द्रतेचे प्रमाण देखील वाढते. ज्यामुळे अस्वस्थता, चिकटपणा जाणवू लागतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, पावसाळ्यात तुम्हाला आजारी पडायचं नसेल, चिकटपणा जाणवू द्यायचा नसेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर पावसाळ्यात चिकटपणा टाळण्यासाठी पुढील पाच उपाय तुम्ही नक्की करून पाहा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. हलके कपडे घाला – हवेतील ओलावा फॅब्रिकमध्ये जाऊ शकतो आणि तुम्हाला घाम येऊ शकतो. त्यामुळे कापसारखे मऊ हलके कपडे घाला. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. स्किनकेअर – त्वरीत त्वचेत शोषले जाणारे हलके मॉइश्चरायझर वापरा. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी, त्वचेची छिद्रे उघडण्यासाठी वारंवार एक्सफोलिएट करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. केस वारंवार धुवा – आर्द्रतेमुळे केसांमध्ये कोंडा वाढू शकतो ; ज्यामुळे टाळूला खाज येऊ शकते. टाळू स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी आपले केस वारंवार धुवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. हायड्रेटेड रहा – पाणी आणि इतर द्रव पदार्थ भरपूर प्या. कारण हायड्रेटेड राहिल्याने शरीर थंड होण्यास आणि उष्णतेचा सामना करण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. स्वच्छता राखणे – बॅक्टेरियाची वाढ व त्वचेची जळजळ टाळण्यासाठी धुतलेले व स्वछ कपडे घाला. ते तुम्हाला फ्रेश राहण्यास मदत करतील. (फोटो सौजन्य: @Freepik)

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल