-
ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, व्यापार आणि वाणीचा दाता आहे.
-
जेव्हा जेव्हा बुध आपली राशी बदलतो किंवा त्याच्या हालचाली बदलतो तेव्हा त्याचा परिणाम लोकांच्या करिअरवर, आर्थिक स्थितीवर दिसून येतो.
-
धनसंपत्ती, व्यवसाय, वाणी यांच्यासाठी कारक आणि पूरक अशी ओळख असलेला बुध ग्रह आता येत्या १९ जुलैला रात्री ८ वाजून ४८ मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
-
त्यामुळे काही राशींची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा आणखी चांगली होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींना बुधाच्या स्थान बदलाचा फायदा होऊ शकतो.
-
बुधाचा राशी बदल कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकतो. या काळात आर्थिक स्थिती सुधारुन भौतिक सुखसोयी वाढण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. करिअरमध्ये यश मिळू शकतो. व्यावसायिकांना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे.
-
धनु राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण लाभदायी ठरु शकते. तुम्हाला पैसे मिळू शकतात. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो. रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरु होऊ शकतात. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
-
बुधदेवाच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांना मेहनतीचं पूर्ण फळ मिळून धनलाभ होण्याची शक्यता आहे. भरपूर पैसे मिळू शकतात. व्यवसायात आणि नोकरीच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी प्रमोशन होऊ शकतं. या काळात वाहन आणि मालमत्ता खरेदी करु शकता.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे