-
आपल्यातील अनेकांना गरम पाण्यात थंड तर थंड पाण्यात गरम पाणी मिसळून पिण्याची सवय असते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, दी इंडियन एक्स्प्रेसने ईशा हठ योग स्कूलमधील शिक्षिका श्लोका जोशी यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्या म्हणाल्या की, गरम आणि थंड पाणी कधीच मिसळून पिऊ नये. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
थंड पाणी पचायला जड आणि गरम पाणी पचायला हलके असते. त्यामुळे थंड आणि गरम पाणी तुम्ही एकत्र करून प्यायलात, तर अपचन होऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
गरम पाणी वात व कफ शांत करते; तर थंड पाणी दोन्ही वाढवते. म्हणून गरम आणि थंड पाणी मिसळून प्यायल्याने पित्त दोष वाढू शकतो आणि आम (ama) निर्माण होतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
जेव्हा तुम्ही गरम व थंड पाणी मिसळता, तेव्हा पाणी गरम करून पिण्याचे फायदे शरीराला मिळत नाहीत. गरम पाण्याप्रमाणे मिश्रित पाण्याचे सेवन चयापचय क्रिया व्यवस्थित होण्याला पूर्णपणे प्रोत्साहन देत नाही. गरम पाण्याची पचनक्रिया सुधारण्याची आणि शरीर शुद्ध करण्याची जी क्षमता आहे ती मिश्रित पाण्यामुळे कमी होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
गरम व थंड पाणी मिसळल्याने तापमानात विसंगती निर्माण होऊ शकते; ज्यामुळे पाचन तंत्र गोंधळून जाते. कारण- त्यांना एकसमान तापमान हाताळण्याची सवय असते. तर अशा चुकीच्या कृतीमुळे पचनशक्ती आणि पोषक घटकांचे शोषण या दोन्ही बाबी कमी होऊ शकतात.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
रक्तवाहिन्या रुंद करून, कार्यक्षम रक्ताभिसरणाला चालना देणे आणि पोषक घटकांचे सहज शोषण सुलभ करून शारीरिक कार्ये वाढविणे हे गरम पाण्याचे गुणधर्म आहेत. तर याउलट थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि पचन प्रक्रिया मंदावते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तसेच या पाण्याचे मिश्रण केल्यावर या विरोधी गुणधर्मांची एकमेकांशी टक्कर होऊ शकते. मग त्यामुळे गरम व थंड पाणी असे दोघांचेही फायदे कमी होऊ शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुमची तहान भागविण्याचा उत्तम उपाय म्हणजे मातीचे मडके वापरणे. “मातीचे मडके नैसर्गिकरीत्या पाणी थंड व शुद्ध ठेवते आणि शरीरातील खनिज सामग्रीदेखील सुधारते.” मातीचे भांडे पाण्याचे तापमान मध्यम ठेवते. या बाबी आयुर्वेदिक तत्त्वांशी अधिक जुळतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…