-
घामामुळे आपल्या शरीराला दुर्गंधी येते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
काखेत येणाऱ्या घामामुळे तर ही दुर्गंधी अगदीच नकोशी वाटते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
स्त्रियांना यामुळे स्लीव्हलेस ड्रेस, ब्लाऊजही घालता येत नाहीत. चारचौघांत गेल्यावर जर घामामुळे काखा ओल्या दिसत असतील किंवा दुर्गंध येत असेल तर विचित्र किंवा लाजिरवाणं सुद्धा वाटते. तर यावर उपाय म्हणून तुम्ही पुढील काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पाणी – भरपूर पाणी प्या. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास, संपूर्ण त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. हायड्रेटेड राहणे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि शरीराची दुर्गंधी कमी करण्यास मदत करते.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
ऑलिव्ह ऑईल : ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि घाम नियंत्रित करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दही : प्रोबायोटिक्सचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ, जसे की दही, पचन सुधारू शकते आणि शरीराची दुर्गंधी कमी करू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
भाज्या : पालेभाज्यांचे नियमितपणे सेवन करा किंवा काकडी, कोबी, पालक आदी तुमचे शरीर ताजेतवाने आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करू शकतात.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
हर्बल टी: हर्बल टीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ गुणधर्म असतात ; जे शरीर ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
लिंबूवर्गीय फळे : सफरचंद, द्राक्षे, टरबूज, अननस, संत्री यासारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेले फळांचे सेवन शरीरातील घामाचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना