-
रात्री झोप येत नाही म्हणून आपण तासंतास रील्स बघत बसतो. रात्री तुमची पुरेशी झोप न झाल्याने दुसऱ्या दिवशी उठल्यावर तुमचं डोकं दुखण्यास सुरुवात होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुमचा दुसरा दिवस चांगला जात नाही. मग तुम्ही झोप उडवण्यासाठी चहा व कॉफीचा आधार घेता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, तुम्ही या गोष्टी टाळून तुमच्या दैनंदिन आयुष्यात पुढील काही गोष्टींचे पालन केल्यास तुमची रात्रीची झोप पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
वेळापत्रक ठरवा : चांगली झोप येण्यासाठी कधी झोपायचं याचं योग्य वेळापत्रक ठरवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
आहार : चांगली झोप येण्यासाठी तुम्ही काय खाता, कोणत्या पेयाचे सेवन करता यावर लक्ष द्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दिवसा झोप मर्यादित ठेवा: दुपारच्या वेळेत जास्त वेळ झोपू नका. त्यामुळे तुम्हाला रात्री चांगली व गाढ झोपू लागू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
शारीरिक हालचाल करा : दिवसभर स्वतःला काही ना काही काम करण्यात व्यस्त ठेवा. शारीरिक हालचाली केल्याने चांगली झोप येऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
शांत वातावरण तयार करा : तुमचा रूम शांत राहील याची काळजी घ्या. यामुळे तुम्हाला चांगली झोप येऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मन शांत ठेवा – रात्री झोपायच्या आधी तुमच्या डोक्यातून सगळे विचार काढून टाका ; जेणेकरून तुमचे मन शांत होईल व गाढ झोप लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही