-
पावसाळा सुरु झाला की, ठिकठिकाणी पाणी साचतं. साचलेल्या पाण्यामुळे सर्वत्र डासांचे प्रमाण वाढते आणि मग डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
डेंग्यूपासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर सगळ्यात आधी डास चावणार नाहीत याची काळजी घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पावसाळ्यात सुरक्षित राहण्यासाठी व डेंग्यूपासून स्वतःचे संरक्षण करण्याच्या काही टिप्स पुढीलप्रमाणे – (फोटो सौजन्य: @Freepik)
-
साचलेल्या पाण्यातून जाऊ नका – साचलेले पाणी हे डासांचे ठिकाण आहे ; ज्यामुळे डेंग्यू होऊ शकतो. डब्यांमध्ये व भांड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका. तुमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
क्रीम लावा – डास दूर करण्यासाठी किंवा डास चावण्याचा धोका टाळण्यासाठी तुमच्या शरीरावर योग्य ती क्रीम लावा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
शरीर झाकलं जाईल असे कपडे घाला – डास चावण्याची शक्यता टाळण्यासाठी संध्याकाळच्या वेळी लांब हातांचा शर्ट, लांब पँट, मोजे, शूज असे पूर्ण कपडे घाला. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मच्छरदाणीचा उपयोग करा – झोपताना मच्छरदाणी वापरा जेणेकरून डासांपासून तुमचे संरक्षण होईल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कॉइल वापरा – डासांना दूर ठेवण्यासाठी तुमच्या घरातील सुरक्षित ठिकाणी मच्छर कॉइल किंवा अगरबत्ती लावा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तसेच आरोग्याबाबत शंका असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जाऊन या. (फोटो सौजन्य: @Freepik)

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल