-
बटाटा हा आपल्यातील अनेकांच्या आवडीचा आहे. अगदी कुठल्याही भाजीत बटाटा टाकला की, त्याची चव अगदी खास होऊन जाते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
साधारणपणे बटाट्याची भाजी करताना किंवा शिजवताना आपण त्याची साल फेकून देतो. पण, बटाट्याच्या सालीचा उपयोग तुम्ही अनेक गोष्टींसाठी करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुम्ही साफसफाई करण्यासाठी बटाट्याच्या सालींचा पुढील सहा प्रकारे उपयोग करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
काच साफ करणे : तुम्ही तुमचा चष्मा, खिडकी किंवा आरसा पुसण्यासाठी बटाट्याची साल वापरू शकता. बटाट्याची साल ओलसर बाजूने या वस्तूंवर चोळा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
बटाट्याच्या सालीचे पाणी : बटाट्याच्या सालीचे पाणी धूळ, डाग स्टील व काच साफ करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
भांडी घासण्यासाठी उपयुक्त : डाग काढून टाकण्यासाठी आणि एखादी वस्तू पुन्हा चमकदार करण्यासाठी बटाट्याच्या सालीच्या आतील भागाने तुम्ही भांडी घासून काढू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मायक्रोवेव्ह क्लिनिंग : बटाट्याच्या साली एक वाटी पाण्यात टाका आणि दुर्गंध कमी करण्यासाठी मायक्रोवेव्हमध्ये काही मिनिटे ठेवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
शूजमधून येणारा दुर्गंध कमी करा – जर तुम्ही बटाट्याची साल रात्री शूजमध्ये ठेवली तर ते तुमच्या शूजमधून येणारा दुर्गंध नैसर्गिकरित्या शोषून घेण्यास मदत करेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
गंज काढून टाका – गंजलेल्या पृष्ठभागासाठी बटाट्याची साल वापरली जाऊ शकते. तुम्ही गंजलेल्या वस्तूवर साल घासू घासून पाहा. (फोटो सौजन्य: @Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”