-
सनातन धर्मात श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात भगवान शिवशंकराची पूजा केली जाते. (पीटीआय)
-
श्रावण महिना केवळ पावसाळ्याच्या आगमनाचाच नव्हे, तर भक्ती, अध्यात्म व सण यांचा मेळ घालणाराही महिना आहे. (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य लाभते आणि आशीर्वाद मिळतात. त्याबरोबरच त्यांच्या वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. (पीटीआय)
-
श्रावण महिन्यातच अविवाहित मुली आणि विवाहित महिला हातांना मेंदी लावतात. तशी परंपराही आहे. विवाहित महिला श्रावण महिन्यात १६ शृंगार करतात. चला तर मग या सगळ्याचं महत्त्व जाणून घेऊ. (इंडियन एक्स्प्रेस)
-
धार्मिक मान्यतांनुसार, श्रावण महिन्यात विवाहित महिलांनी मेंदी लावणे ही कृती त्यांच्या पतीप्रति प्रेम आणि समर्पणाची प्रतीक मानली जाते. मेंदी लावल्याने पती-पत्नीमधील प्रेम वाढते. असे मानले जाते की, मेंदी लावल्याने माता पार्वती आणि भगवान शंकर प्रसन्न होतात आणि त्यांचा कृपाहस्त त्या विवाहित महिलांना सदैव लाभतो. (इंडियन एक्स्प्रेस)
-
श्रावण महिन्यातच झुला झुलण्याची (झोका घेण्याची) परंपरा खूप जुनी आहे. मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाने प्रियतमा राधेला श्रावण महिन्यातच झुल्यावर झुलवले होते. तेव्हापासून श्रावणामध्ये झुलण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मातही झुला झुलणे हे पावित्र्याचे प्रतीक मानले जाते. (इंडियन एक्स्प्रेस)
-
श्रावण महिन्यात हिरवी साडी नेसण्याची आणि बांगड्या घालण्याची परंपरा आहे. खरे तर हिरवा रंग भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. हिरवा रंग हे निसर्गाचे प्रतीक आणि धार्मिक मान्यतेनुसार निसर्ग हे देवी पार्वतीचे रूप आहे. (इंडियन एक्सप्रेस)
-
श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा महिना आणि या महिन्यात निसर्ग पृथ्वीवर चोहीकडे जणू हिरवाईची चादर अंथरतो. त्याचबरोबर असे मानले जाते की, हिरवा रंग धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. (इंडियन एक्स्प्रेस)
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”