-
हिमोग्लोबिन हे रक्तातील ऑक्सिजनचे प्रवाह नियंत्रित ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया काही खाद्यपदार्थांबद्दल जे शरीतात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
-
पालक आणि मेथी सारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड मुबलक प्रमाणात असते. हे घटक हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करतात आणि अशक्तपणा दूर करू शकतात.
-
सॅल्मन, ट्यूना आणि मॅकेरल सारखे मासे देखील लोहाचे चांगले स्रोत आहेत. याव्यतिरिक्त, त्यात ओमेगा ३ फॅटी ऍसिड असतात, जे संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
-
हरभरा, मसूर, राजमा आणि सोयाबीन यांसारख्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि प्रथिने असतात. त्यांचे नियमित सेवन हिमोग्लोबिन पातळी राखण्यासाठी उपयुक्त आहे. -
ओट्स, तांदूळ आणि क्विनोआसारख्या संपूर्ण धान्यांमध्ये लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. हे शिरीरात उपयुक्त ऊर्जा प्रदान करतात आणि हिमोग्लोबिन पातळी सुधारतात. -
बदाम, तीळ आणि भोपळ्याच्या बियांमध्ये लोह, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. त्यांच्या सेवनाने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. -
मनुका, अंजीर आणि पिस्ता यांसारख्या सुक्या फळांमध्ये लोह आणि इतर आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यांच्या सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढू शकते. -
बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात लोह, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी असते. हे ॲनिमिया दूर करण्यात मदत करते आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते. बीटरूटचे सेवन सॅलड, ज्यूस किंवा सूपच्या स्वरूपात करता येते. -
संत्री, लिंबू, किवी आणि स्ट्रॉबेरी यांसारखे व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ लोहाचे प्रमाण वाढवतात. या फळांच्या सेवनाने शरीरात लोहाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी सुधारते.
(फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल