-
मुलतानी मातीला प्राचीन काळापासून त्वचेच्या काळजीसाठी उपयुक्त मानले जाते. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामध्ये त्वचा थंड होण्यापासून ते त्वचा चमकदार बनवण्यापर्यंतचे गुणधर्म असतात. जाणून घेऊया मुलतानी मातीच्या काही खास फेस पॅकबद्दल, जे त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी प्रभावी आहेत.
-
तेलकट त्वचेसाठी तुम्ही मुलतानी माती आणि गुलाबपाणीचा फेस पॅक लावू शकता. यासाठी १ चमचा मुलतानी मातीमध्ये २ चमचे गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा, नंतर थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून तीन वेळा लावू शकता. -
मुलायम त्वचेसाठी तुम्ही बदाम आणि दुधासह मुलतानी माती फेस पॅक लावू शकता. यासाठी १ चमचे बदाम पावडर, १ चमचे कच्चे दूध आणि २ चमचे मुलतानी माती एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा, नंतर थंड पाण्याने धुवा. तुम्ही हे आठवड्यातून दोनदा लावू शकता. -
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही टोमॅटो आणि मुलतानी मातीचा फेस पॅक लावू शकता. यासाठी २ चमचे टोमॅटोचा रस, २ चमचे मुलतानी माती, १ चमचा चंदन पावडर आणि १ चमचा हळद कोमट पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. ही पेस्ट तुम्ही रोज लावू शकता. -
चमकदार त्वचेसाठी तुम्ही मध आणि मुलतानी मातीचा फेस पॅक लावू शकता. यासाठी ३ चमचे मुलतानी माती, १ चमचा टोमॅटोचा रस, १ चमचा मध, १ चमचा लिंबाचा रस आणि १/२ चमचा कच्चे दूध एकत्र करून एक पेस्ट बनवा. १० मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. ही पेस्ट तुम्ही आठवड्यातून एकदा लावू शकता. -
चेहऱ्यावरील फ्रिकल्ससाठी तुम्ही पुदिना आणि मुलतानी मातीचा फेस पॅक लावू शकता. यासाठी १ चमचा मुलतानी माती, १ चमचा पुदिन्याची पेस्ट आणि १ चमचा दही मिक्स करून स्मूद पेस्ट बनवा. ही पेस्ट २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. ही पेस्ट तुम्ही रोज लावू शकता. -
चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीमध्ये चंदन पावडर मिसळून फेस पॅक बनवू शकता. यासाठी १ चमचा मुलतानी माती, १ चमचा चंदन पावडर आणि २ चमचे कच्चे दूध मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटे लावा, नंतर थंड पाण्याने धुवा. ही पेस्ट आठवड्यातून फक्त दोनदाच वापरा.
-
(फोटो स्त्रोत: फ्रीपिक)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल