-
दिवसभर काम, घरी आल्यावर घरचं काम, कौटुंबिक जबाबदाऱ्या याचा ताण प्रत्येकाला असतो. त्याचा प्रभाव तुमच्या स्वभावातही दिसून येतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कमी बोलणे, चिडचिड वाढणे, या गोष्टी प्रत्येकामध्ये दिसू लागतात. तर काही जणांना भूक लागल्यावर त्याची चिडचिड होते. तर अशावेळी तुम्ही पुढील सात पदार्थांचा आहारात समावेश करून पाहा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
ब्लूबेरी : ब्लूबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे असतात ; जे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे तणाव, चिंता कमी होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेट कॉर्टिसोल पातळी कमी करण्यास मदत करतात. तसेच डार्क चॉकलेट अँटिऑक्सिडंट म्हणून देखील मदत करते ; जे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हळद: हळद तुमचा मूड व मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. तसेच मेंदूतील जळजळ कमी करते ; ज्यामुळे नैराश्य आणि चिंता निर्माण होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कॅमोमाइल : चिंताकमी करण्यासाठी हे वापरले जाते. तसेच तुम्ही हे चहा म्हणून देखील पिऊ शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दही : दही हा पदार्थ तणाव किंवा चिंताग्रस्त लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. कारण त्यात प्रोबायोटिक्स असतात ; जे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये अमीनो ॲसिड असतात ; जे मेंदूचे आरोग्य आणि चिंता सुधारतात असे म्हटले जाते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
बदाम : हे केवळ मेंदूचे कार्य सुधारत नाही. तर शरीरातील व्हिटॅमिन ई देखील वाढवते आणि तणाव, शरीरातील जळजळ कमी करते. (फोटो सौजन्य: @Freepik)
“साहित्यिकांनीही मर्यादा पाळायला हव्यात”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सल्ला; म्हणाले, “पार्टी लाईनवर…”