-
सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाचा जसा आरोग्यावर परिणाम होतो तसाच केसांवरही होतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पावसाळ्यात वाढणारी आर्द्रता आणि बदलत्या तापमानामुळे केस तेलकट व चिकट होऊ शकतात. मग अशावेळी शॅम्पू, तेल बदलण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी या समस्येवर उपाय करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर अशा वेळी काही नैसर्गिक हेअर मास्कचा तुम्ही घरी बनवू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पावसाळ्यात तुमच्या केसांना लावण्यासाठी काही नैसर्गिक हेअर मास्क पुढीलप्रमाणे : (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. दही – दह्याच्या वाटीत एक चमचा ऑलिव्ह ऑईल घाला आणि मिक्स करून घ्या आणि केसांना लावा. तीस मिनिटे तसंच राहू द्या आणि शॅम्पूने केस धुवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. एलोवेरा – कोरफडीच्या पानांतून जेल काढून घ्या आणि नारळाच्या तेलात मिसळा. त्यानंतर हे मिश्रण टाळू आणि केसांना लावा. १५ मिनिटे तसंच राहू द्या आणि शॅम्पूने केस धुवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. काकडी – काकडी सोलून घ्या आणि त्यात १ चमचा खोबरेल तेल मिसळून पेस्ट बनवा. पेस्ट आपल्या केसांना आणि टाळूला लावा आणि ३० मिनिटे राहू द्या. नंतर केस शॅम्पूने धुवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. केळ – एका बाऊलमध्ये दोन केळी घ्या. त्यात एक चमचा नारळ तेल घाला आणि स्मॅश करा. पेस्ट तयार होईल ती पेस्ट आपल्या केसांना आणि टाळूला लावा. २० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर केस शॅम्पूने धुवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. हिना हेअर मास्क – पावडरमध्ये एक चमचा खोबरेल तेल घाला.त्यात थोडे पाणी घाला आणि पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट केसांना लावा आणि ४० मिनिटे तसंच राहू द्या. नंतर केस शॅम्पूने धुवा. (फोटो सौजन्य: @Freepik)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य