-
Exercises for PCOS: अनेक महिला आणि मुलींना पीसीओएसचा त्रास असतो. या समस्येत शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. शरीरात ॲस्ट्रोजनऐवजी टेस्टोस्टेरोन हे पुरुषी हार्मोन्स वाढते. (Photo: Freepik)
-
पीसीओएसमध्ये चेहऱ्यावरचे व अंगावरचे केस वाढणे, पाळी अनियमित येणे, चेहऱ्यावर मुरमे वा पुटकुळ्या येणे, ओटीपोट वाढणे, तसेच गर्भधारणेत अडचणी जाणवणे या समस्या जाणवतात. पीसीओएस ही गंभीर समस्या असली तरी योग्य व संतुलित आहार आणि व्यायाम याद्वारे ती नियंत्रित करता येते. (Photo: Freepik)
-
पीसीओएस हाय इंटेन्सिटी व्यायामाने कमी होतो हे कोणत्याही संशोधनाने सिद्ध केले नाही. परंतु, योग्य प्रकारचे स्ट्रेंथ ट्रेनिंग घेतल्याने पीसीओएसची लक्षणे कमी होण्यास मदत होते, अशी माहिती होलिस्टिका वर्ल्डचे संस्थापक व संचालक डॉ. धर्मेश शाह यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली आहे.(Photo: Freepik)
-
हाय इंटेन्सिटी व्यायामामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते. चेहऱ्यावर मुरमे आणि त्वचेवरील केसांची जास्त वाढ यांसारखी लक्षणे कमी होऊ शकतात.(Photo: Freepik)
-
पीसीओएसचा त्रास कमी करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंगचा चांगला उपयोग होतो. पुल अप्स, पुश अप्स, स्क्वाॅट्स, प्लँक हे स्ट्रेंथ ट्रेनिंगचे प्रकार आहेत. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायू मजबूत होतात. (Photo: Freepik)
-
PCOS असलेल्या स्त्रियांनी अॅरोबिक व्यायाम करावेत. म्हणजेच चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे इत्यादी क्रियांमुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. (Photo: Freepik)
-
अॅरोबिक व्यायामांमध्ये ५ ते १० मिनिटांचा वॉर्मअप, ३० ते ३५ मिनिटे चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे इत्यादी व्यायामप्रकारांचाही उपयोग होतो.(Photo: Freepik)
-
प्राणायाम केल्यानेही श्वासोच्छवास क्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे थकवा येण्याचे प्रमाण कमी होऊन, लठ्ठपणा व पाळीच्या समस्या कमी होण्यास हातभार लागतो. (Photo: Freepik)
-
नियमित व्यायाम, योग्य आहार व उत्तम मानसिक आरोग्य यांमुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.(Photo: Freepik)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…