-
चालणे हा अतिशय सोपा पण आरोग्यासाठी फायदेशीर व्यायाम आहे. अनेक आरोग्य अहवालात असे दिसून आले आहे की, केवळ चालण्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता आणि यामुळे तुम्हाला अनेक आश्चर्यकारक फायदे झालेले देखील दिसतात. अशा परिस्थितीत, दररोज ३ किमी चालण्याचा माणसाच्या शरीरावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.
-
वजन कमी करण्यास मदत होते
आजच्या काळात बहुतेक लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत. जर तुम्ही देखील या लोकांपैकी एक असाल तर दररोज फक्त ३ किमी चालण्याने तुम्ही तुमच्या शरीरातील फॅट्स कमी होऊ शकतात. चालणे चयापचय वाढवते, ज्यामुळे शरीर अधिक कॅलरी बर्न करते. त्याचबरोबर कॅलरीज बर्न केल्याने तुमचे वजन संतुलित राहते. -
हृदयाचे आरोग्य चांगले राहते
अनेक आरोग्य अहवालात असे दिसून आले आहे की दररोज चालल्याने आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते. चालण्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. अशा परिस्थितीत, दररोज चालण्याने हृदय विकाराचा झटका आणि स्ट्रोक यासारख्या घातक परिस्थितींचा धोका कमी होऊ शकतो. -
मानसिक आरोग्य सुधारते
चालण्याने तणाव, चिंता आणि नैराश्याची लक्षणे कमी होतात. याशिवाय चालताना तुमचे शरीर एंडोर्फिन हार्मोन रीलिज करतो, ज्याला ‘फील-गुड’ किंवा ‘हॅपी हार्मोन’ असेही म्हणतात. हे तणाव कमी करण्यात आणि दिवसभर तुमचा मूड सुधारण्यास मदत करू शकते, ज्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य सुधारते. -
स्नायूंची ताकद वाढण्यास होते मदत (Muscle Building)
चालताना संपूर्ण शरीराची हालचाल होते. यादरम्यान तुमचे पाय, पाठ, हात यासह संपूर्ण शरीर एकत्र काम करत असते. अशा परिस्थितीत, दररोज ३ किमी चालणे, मसल बिल्डिंगसाठी आणि स्नायूंना टोनिंग करण्यास मदत करू शकते. -
पचनक्रिया निरोगी राहते
याशिवाय चालणे तुमच्या पचनक्रियेला मदत करते. चालण्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टला (gastrointestinal tract) चालना मिळते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अपचन, बद्धकोष्ठता, गॅस, ऍसिडिटी इत्यादी समस्यांनी त्रस्त असाल तर दररोज चालणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. (All Photos- Freepik)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख