-
दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर येथील Rau IAS स्टडी सर्कल कोचिंगमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर अनेक कोचिंग सेंटर्स सील करण्यात आली आहेत, त्यापैकी एक विकास दिव्यकीर्तीचे दृष्टी आयएएस कोचिंग आहे. (@divyakirti.vikas/Insta)
-
तळघरात विकास दिव्यकीर्तीचे कोचिंग सेंटर सुरू होते, त्यानंतर एमसीडीने ते सील केले आहे. (@divyakirti.vikas/Insta)
-
या दुर्घटनेवर विकास दिव्यकीर्ती यांच्याकडून कोणतेही वक्तव्य आले नाही, त्यानंतर त्यांना आदर्श मानणाऱ्या लाखो स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. (@divyakirti.vikas/Insta)
-
मात्र, आता त्यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली असून त्यात सुधारणा करणे ही प्रत्येक संस्थेची जबाबदारी असून मी माझी जबाबदारी पार पाडण्यास तयार असल्याचे सांगितले. दरम्यान विकास दिव्यकीर्ती यांच्या कुटुंबात कोण आहे आणि ते काय करतात ते जाणून घेऊया. (@divyakirti.vikas/Insta)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकास दिव्यकीर्ती यांच्या पत्नी तरुणा वर्मा दृष्टी आयएएस कोचिंगच्या संचालक आहेत आणि अनेक वर्षांपासून त्या या संस्थेत शिकवत आहेत. तरुणा दृष्टी वेल्फेअर फाउंडेशनच्या सीईओ आणि एमडी देखील आहे. (@divyakirti.vikas/Insta)
-
विकास दिव्यकीर्ती यांच्या पत्नीचे नाव तरुणा वर्मा आहे. दोघांनी १९९८ मध्ये लग्न केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही त्यांच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये भेटले होते. विकास आणि तरुणा यांना सात्विक नावाचा मुलगाही आहे. (@taruna.verma73/Insta)
-
तरुणा वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या दररोज व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. (@taruna.verma73/Insta)
-
विकास दिव्यकीर्ती यांना दोन भाऊ आहेत. त्यांचा एक भाऊ अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे तर दुसरा भाऊ सरकारी नोकरीत आहे. (@divyakirti.vikas/Insta)
-
विकास दिव्यकीर्ती यांचे वडील महर्षि दयानंद विद्यापीठात हिंदी साहित्याचे प्राध्यापक आहेत. (@taruna.verma73/Insta)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…