-
ड्राय फ्रुट्सचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात यासाठी ड्राय फ्रुट्स हे रोजच्या आहाराचा भाग बनवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
-
बहुतेक लोक सकाळी जास्त प्रमाणात ड्राय फ्रुट्स खातात. पण नाश्त्यामध्ये काही ड्रायफ्रूट्सचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर होण्याऐवजी नुकसान देखील करू शकतात. जाणून घेऊया या ड्राय फ्रुट्सबद्दल.
-
जर्दाळूमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगल्या प्रमाणात आढळतात पण रिकाम्या पोटी जर्दाळू खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. जर्दाळूमध्ये जास्त प्रमाणात नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखर तर वाढतेच पण पचनावरही वाईट परिणाम होतो. यासाठी रिकाम्या पोटी जर्दाळू खाणे टाळावे. -
मनुका हे पोषक तत्वांनी युक्त ड्राय फ्रुट्स आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साखर देखील असते, ज्यामुळे तुमची रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते, यासाठी रिकाम्या पोटी मनुके खाणे टाळावे. -
मनुका त्यांच्या उच्च फायबरसाठी डेकिल प्रसिद्ध आहे. फायबर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि पचनासाठीही हे महत्वाचे आहे. सकाळी उपाशी पोटी मनुका खाल्ल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात पण फायबरसाठी तुम्ही मानूके रात्री खाऊ शकता. -
सकाळी रिकाम्या पोटी अंजीर खाल्याने पोटाच्या अनेक समस्या वाढू शकतात याशिवाय रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते. -
क्रॅनबेरी हे चवीला आंबट असतात म्हणून अनेकदा हे गोड पदार्थांसोबत किंवा साखरेसोबत खाल्ले जाते. यामुळे त्यात साखरेचे प्रमाण वाढते रिकाम्या पोटी क्रॅनबेरी खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, जे आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल