-
Soup recipe specially for monsoon: पावसाळ्यात काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते. चहा, कॉफी प्यायला आवडत असेल तरी सारखं सारखं चहा-कॉफी पिणं तब्येतीसाठी चांगलं नसतं. जेवताना किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर सूप हा उत्तम पर्याय आहे. (Photo: Freepik)
-
पावसाळ्याच्या दिवसात सूप प्यायल्यानं घश्याला आराम मिळतो आणि सर्दी-खोकल्याच्या त्रासापासूनही लांब राहता येतं. चला तर मग जाणून घेऊया हा क्रिम गार्लिक मशरूम सूप बनवण्याची सर्वात सोपी पद्धत.(Photo: Freepik)
-
४-५ मशरूम, १/२ कप चिरलेला कांदा, २-३ लसूण पाकळ्या, १/२ इंच आले, ३-४ कोथिंबीर काड्या, कोथिंबीर, १ टेबलस्पून बटर, १ टीस्पून मिरपूड, चवीनुसार मीठ, १/२ कप दूध, १ टेबलस्पून लिंबू रस, आवश्यकतेनुसार पाणी (Photo: Freepik)
-
मशरूम कांदा कोथिंबीर काड्या आलं लसूण लिंबू चिरून घ्यावा. पॅनमध्ये बटर घालून त्यावर आलं लसूण कांदा कोथिंबीर काड्या घालून १-२ मिनिटे परतून घ्यावे.(Photo: Freepik)
-
मशरूम मीठ मिरपूड घालून एकत्र करावे २-३ मिनिटे शिजू द्यावे आणि मिश्रण थंड झाल्यावर दूध घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.(Photo: Freepik)
-
मशरूम चांगले धुवून घ्या आणि त्याचे दोन- दोन तुकडे करून घ्या. (Photo: Freepik)
-
कढईमध्ये ऑलिव्ह ऑईल टाकून त्यात मशरूम आणि बारीक चिरलेला लसून मीठ आणि काळी मिरी टाकून परतून घ्या आणि त्यानंतर मशरूम चांगले शिजवून घ्या.(Photo: Freepik)
-
तोपर्यंत दुसऱ्या पॅनमध्ये बटर टाका. बटर वितरळ्यावर मैदा टाका. मैद्याचा रंग थोडासा बदलला की त्यामध्ये मशरूम आणि व्हेजिटेबल स्टॉक टाका.(Photo: Freepik)
-
आता त्यामध्ये थाईम टाका आणि हे मिश्रण वारंवार हलवत रहा. सूप घट्ट होण्यास सुरूवात झाली की त्यामध्ये थोडा सोया सॉस आणि फ्रेश क्रिम टाका. अशाप्रकारे सूप तयार आहे. (Photo: Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”