-
हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी कॅल्शियम हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याशिवाय इतर शारीरिक कार्यांसाठी कॅल्शियम अत्यंत आवश्यक आहे. विशेषत: ज्या महिलांना मेनोपॉज आला आहे, त्यांच्या शरीरात कॅल्शियमची मात्रा कमी असते. पण, महिलांनो, तुमच्या शरीरात कॅल्शियमची मात्रा कमी आहे, हे कसे ओळखावे? जाणून घेऊ या. (Photo : Freepik)
-
कॅल्शियमच्या कमतरतेची अनेक लक्षणे दिसून येतात. सुरुवातीला हे लक्षणे लहान वाटू शकतात, पण कालांतराने ही लक्षणे आणखी गंभीर होऊ शकतात. (Photo : Freepik)
-
१. स्नायूंचे दुखणे वाढू शकतात, पाठ आणि पायामध्ये वेदना जाणवतात. (Photo : Freepik)
-
२. अचानकपणे हाता-पायाला मुंग्या येऊ शकतात. (Photo : Freepik)
-
३. जर तुम्हाला सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात कॅल्शियमची मात्रा कमी असू शकते.३. जर तुम्हाला सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात कॅल्शियमची मात्रा कमी असू शकते. (Photo : Freepik)
-
४. निरोगी त्वचा आणि नखांसाठी कॅल्शियमची मात्रा नीट असणे आवश्यक आहे. कॅल्शियममुळे तुमची त्वचा निरोगी राहते. (Photo : Freepik)
-
५. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दाताच्या समस्या वाढतात. (Photo : Freepik)
-
६. न्यूरोट्रांसमीटरच्या कार्यावर परिणाम करणारी कॅल्शियमची कमी मात्रा व्यक्तीमध्ये चिंता, नैराश्य आणि चिडचिड निर्माण करते. (Photo : Freepik)
-
७. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हृदयाचे ठोके अनियमित दिसून येतात, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. (Photo : Freepik)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल