-
यंदा १९ ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा होणार आहे. रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. या शुभ प्रसंगी, बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. (इंडियन एक्सप्रेस)
-
त्याच वेळी, या प्रसंगी, भाऊ त्यांच्या बहिणींचे संरक्षण करण्याचे वचन देतात आणि त्यांना पैसे किंवा भेटवस्तू देखील देतात. या रक्षाबंधनाला तुमच्या बहिणीला कोणती भेटवस्तू द्यायची याबाबत तुम्ही संभ्रमात असाल तर येथे नमूद केलेल्या या काही टिप्स तुमच्या उपयोगी पडतील. (फ्रीपिक)
-
1- रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या बहिणीला इलेक्ट्रॉनिक वस्तू भेट देऊ शकता. यामध्ये तुम्ही मोबाईल फोन, इअरफोन, म्युझिक सिस्टीम किंवा स्मार्ट घड्याळ देखील देऊ शकता. (फ्रीपिक)
-
२- रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर तुम्ही तुमच्या बहिणीला तिचे आवडते दागिने भेट देऊ शकता. तुम्ही कानातले, अँकलेट, बांगड्या आणि नेकलेसही गिफ्ट करू शकता. (फ्रीपिक)
-
3- कोणत्याही महिलेला मेकअप करणे आणि स्टायलिश दिसणे आवडतेच, या गोष्टीचा विचार करून तुम्ही तुमच्या बहिणीला ब्रँडेड ब्युटी किंवा स्किन केअर उत्पादने गिफ्ट करू शकता. (फ्रीपिक)
-
4- तुम्ही तुमच्या बहिणीला हँड बॅग देखील भेट देऊ शकता. अनेक ट्रेंडी हँड बॅग ऑनलाइन आणि ऑफलाइन तुम्हाला मिळू शकतात. (फ्रीपिक)
-
5- जर तुमच्या बहिणीचे लग्न झाले असेल तर तुम्ही तिला घरातील वस्तू गिफ्ट करू शकता. यामध्ये तुम्ही फर्निचर (बेड, सोफा किंवा डायनिंग टेबल), डिनर सेट किंवा रूम डेकोरेशनच्या वस्तू भेट म्हणून देऊ शकता. (फ्रीपिक)
-
रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त
दरम्यान, यंदा रक्षाबंधन सावन पौर्णिमा तिथी 19 ऑगस्ट रोजी पहाटे 03:43 वाजता सुरू होईल आणि 11:55 वाजता समाप्त होईल. (इंडियन एक्सप्रेस)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”