-
रक्षाबंधनासाठी मेकअप, हेअरस्टाईल आणि आउटफिटची जशी निवड विचार करून करता तशीच मेंदीची का नाही करत? या बहिण भावाच्या खास सणादिवाशी जास्त कष्ट न घेता काही मेंदी डिझाईन्स तुम्ही स्वत: घरच्या घरी तुमच्या हातावर काढू शकता. ज्याने तुमचा हा दिवस आणखी खास होईल.
-
डिझाईन १- जास्त मेहनत न घेता अगदी साध्या सोप्या डिझाईन काढून तुम्ही ही मेंदी पूर्ण करा.
-
डिझाइन २- ही मेंदी डिझाईनदेखील सध्या खूप चर्चेत आहे.
-
डिझाइन ३- जास्त मेहनत घ्यायची नसेल तर अशाप्रकारचे फुलांचे पॅटर्न काढून तुम्ही ही डिझाईन रिपीट करू शकता.
-
डिझाइन ४- हाताच्या मागील बाजूसदेखील तुम्ही अशी सुरेख डिझाईन काढून मिनिमल मेंदी काढू शकता.
-
डिझाइन ५- रेखीव, सुरेख मेंदी काढायची असेल तर ही डिझाईन नक्की ट्राय करा.
-
डिझाइन ६- जर भरीव मेंदी काढायची असेल तर ही डिझाईन तुमच्यासाठी योग्य ठरेल.
-
डिझाइन ७- मेंदीसाठी कल्पना सुचत नसेल तर हा पॅटर्न फॉलो करू शकता.
-
डिझाइन ७- हाताच्या मागीस बाजूस एका बोटावरच मेंदी काढण्यापेक्षा अशी सगळ्याच बोटांवर काढली तर हात आणखी सुरेख दिसेल.
-
डिझाइन ८- मोराची डिझाईन काढून त्यात असे सुंदर पॅटर्न समाविष्ट करून अशी डिझाईन काढू शकता. हा ट्रेंड कधीच जुना होत नाही.
-
हातावर सुंदर मेंदी काढल्यानंतर तिचा रंग गडद होण्यासाठी पुढील टिप्स लक्षात घ्या.
-
हातावर मेंदी काढल्यानंतर हात लगेच धुणे टाळा. काही तास हातावर मेंदी तशीच राहू द्या.
-
मेंदी काढल्यानंतर लिंबू रस व साखर यांचे मिश्रण कापसाने हलक्या हाताने लावा. त्यामुळे रंग गडद होण्यास मदत होईल.
-
काहीजण मेंदी लावल्यानंतर त्यावर लवंगाची वाफ देतात, यानेदेखील रंग गडद होण्यास मदत होते.
-
मोहरीचे तेल लावल्यानेदेखील रंग गडद होण्यास मदत होते.

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे