-
भारतीय संस्कृतीत पूर्वीपासूनच सोन्यासोबत चांदीचे दागिनेदेखील मोठ्या प्रमाणात वापरले जातात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पूर्वी स्त्रिया पायात नेहमी पैंजण, जोडवी घालायच्या तसेच तरुण मुलीदेखील चांदीचे विविध दागिने वापरायच्या. परंतु, हल्लीच्या बदलत्या फॅशनमुळे सण-समारंभ सोडल्यास कोणीही आवर्जून हे दागिने वापरत नाही. (फोटो सौजन्य: Freepik)
-
हिंदू धर्मात सोन्याइतकंच चांदीच्या दागिन्यांनादेखील खूप शुभ मानले जाते. शिवाय चांदी साक्षात देवी लक्ष्मीलादेखील खूप प्रिय आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
चांदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्मदेखील असतात, जे त्वचेचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करू शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)




