-
यावर्षी कृष्ण जन्माष्टमी हा सण २६ ऑगस्टला साजरा होणार आहे. या निमित्ताने लोक आपली घरे, मंदिरे सजवतात आणि कृष्णाचे बालरूप लाडू गोपाळाला सजवतात. अशा वेळेस आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत ज्या मदतीने तुम्ही तुमच्या मंदिराला अतिशय सुंदर पद्धतीने सजवू शकता.
-
फुलांची सजावट
देवघराच्या सजावटीसाठी फुलांचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी तुम्ही मंदिर सजवू शकता तसेच मंदिराच्या भिंतींवरदेखील तुम्ही फुलांनी सजावट करू शकता. झेंडू, चमेली आणि गुलाबाची फुले विशेष शुभ मानली जातात. -
दिव्यांचा वापर
जन्माष्टमीनिमित्त देवघर दिव्यांनी सजवा. दिवे विशेषतः या उत्सवाचे सौंदर्य वाढवतात. पूजेच्या वेळी रात्रीच्या अंधारात दिव्यांचा प्रकाश आनंनदायी वातावरणाची निर्मिती करतो. -
झोपाळ्याची सजावट
भगवान श्रीकृष्णाच्या झोपाळ्याला सजवण्याची ही एक पारंपारिक पद्धत आहे. एक सुंदर झोपाळा सजवा आणि त्यात श्रीकृष्णाची मूर्ती स्थापित करा. झोपाळ्याला फुलांनी आणि रंगीबेरंगी कपड्यांनी सजवायला विसरू नका. -
मडके आणि लोणी
देवघरात एक लहानसे मडके आणि लोणी देखील ठेवता येऊ शकते. भगवान कृष्णाला लोणी खूप आवडते, म्हणून अशी सजावटदेखील तुम्ही करू शकता. -
मोराची पिसे आणि बासरी
मोराची पिसे आणि बासरी हे भगवान श्रीकृष्णाचे प्रतीक आहेत. देवघरात सजावट म्हणून त्यांचा वापर करू शकता. भिंतींवर किंवा दरवाजांवर मोराची पिसे लावा आणि बासरी मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ ठेवा. ही सजावट केवळ सुंदर दिसत नाही तर याला धार्मिक महत्त्वही आहे. -
हिरवळ
भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्रांसह जंगलात गायी आणि शेळ्या चरायला घेऊन जात असत. हा विचार करून, मंदिराच्या आजूबाजूला लहान कुंड्यांमध्ये रोपे लावून देवघराची सजावट देखील करू शकता. -
रांगोळी
देवघराच्या प्रवेशद्वारावर आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढा. नैसर्गिक रंगांनी सजवा आणि आकर्षक डिझाइनसह सजावट पूर्ण करा. -
सजावटीचे कापड आणि कपडे
श्रीकृष्णाच्या मूर्तीला सुंदर वस्त्रे परिधान करून सजवा. सुंदर वस्त्र, दागिने यामुळे देवाची पूजा आणखीनच खास बनते. तुम्ही मंदिराभोवतीदेखील रंगीबेरंगी कपड्यांनी सजावट करू शकता. -
कृत्रिम धबधबे आणि पाण्याची सजावट
तुम्ही देवघर कृत्रिम धबधबे आणि पाण्याने देखील सजवू शकता. हे ताजेतवाने आणि शांत वातावरण तयार करण्यात मदत करते. यासोबतच वाहत्या पाण्याचा आवाजही एक सुखद अनुभव देतो. -
लाईटिंग
सजावटीत लाईटिंगला विशेष महत्त्व आहे. रंगीबेरंगी लाईट्सने वापर करून देवघर सजवा. त्यामुळे वातावरणात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण होईल.
(Photo Courtesy: Pexels)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई