-
फॅटी लिव्हर म्हणजे जेव्हा यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होते, ज्यामुळे यकृताच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. हा आजारामुळे आपल्या आहार आणि जीवनशैलीवर परिणाम होतो.
-
योग्य आहाराचे पालन करणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून यकृत निरोगी ठेवता येते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करता येईल. जर तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचे समावेश करू शकता.
-
लसणामध्ये ऍलिसिन आणि इतर अँटिऑक्सिडंट असतात जे यकृताची सूज कमी करण्यास आणि चरबी जमा होण्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. दररोज लसणाचे सेवन केल्याने यकृत डिटॉक्स होण्यास आणि शरीरातील चरबीची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते.
-
ओट्स आणि क्विनोआसारख्या संपूर्ण धान्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. हे यकृतातील चरबी कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात. रक्तातील साखर स्थिर ठेवण्यासाठी फायबरचे अतिरिक्त प्रमाण उपयुक्त आहे.
-
हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे संयुग असते जे यकृताच्या आरोग्यास प्रोत्साहन देते. कर्क्युमिन यकृताची जळजळ कमी करण्यासाठी आणि चरबी जमा होण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
-
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे यकृताचे आरोग्य सुधारतात आणि हे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. हे पचन सुधारून शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील मदत करते.
-
कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ऍसिड आणि इतर अँटिऑक्सिडंट असतात जे यकृत निरोगी ठेवण्यास मदत करतात. यकृताची जळजळ कमी करण्यासाठी आणि चरबी नियंत्रित करण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.
-
सर्व फोटो: फ्रीपीक
![Sun transit in dhanishta nakshtra](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2024-06-08T201503.979.jpg?w=300&h=200&crop=1)
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा