-
ज्योतिष शास्त्रानुसार सप्टेंबर महिना खूप खास आहे, या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. राशी गोचरसह ग्रहांची युती होणार आहे ज्यामुळे विविध प्रकारचे शुभ आणि अशुभ योगाचा निर्माण होत आहे.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्यामध्ये बुध ग्रह स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. सुमारे एक वर्षानंतर बुधदेव कन्या राशीत प्रवेश करणार आहेत.
-
त्यामुळे भद्रा राजयोग तयार होणार आहे. अशा स्थितीत हा राजयोग सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव टाकेल. पण काही राशी अशा आहेत ज्या राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या काळात काही राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
-
या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात चांगले क्षण येऊ शकतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
-
बुधदेवाच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. शैक्षणिक स्पर्धेच्या क्षेत्रातही अपेक्षित यश मिळू शकतो. करिअरच्या बाबतीत या वेळी तुम्हाला कुठूनतरी चांगली बातमी मिळू शकते.
-
बुध राशीतील बदल धनु राशींच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. नशीब तुम्हाला साथ देऊ शकतो. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकते. या काळात केलेली गुंतवणूक तुमच्या संपत्तीत वाढ करणारी ठरु शकते.
-
बुधदेवाच्या कृपेने मकर राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठा लाभ होऊ शकतो. नोकरदारांना बढती मिळण्याची चिन्हे आहेत. व्यापारी वर्गातील लोकांना या वर्षी चांगला नफा मिळू शकतो. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”