-
अनेकांना फळं खाण्याची सवय असते. अनेक आरोग्य तज्ञ देखील फळं खाण्याचा सल्ला देतात. फळांमध्ये सर्वात पौष्टिक फळ म्हणजे ‘केळ’. दररोज केळीचे सेवन स्नायूंच्या विकासात मदत करते. केळीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर आवश्यक पोषक तत्वांचा उत्तम स्रोत असतो.
-
केळ पौष्टिक असले तरी काही लोकांसाठी हे त्रासदायक ठरू शकतात. जाणून घेऊया केळ खाल्ल्यामुळे होणाऱ्या आरोग्य समस्या.
-
केळीमध्ये जास्त प्रमाणात नैसर्गिक साखर असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते यासाठी मधुमेही रुग्णांनी हे टाळावे.
-
केळीमध्ये कॅलरीज जास्त असतात, विशेषत: जेव्हा ते दूधासोबत सेवन केल्याने यामधील कॅलरीज अधिक वाढते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी केळी खाणे टाळावे.
-
लैक्टोजची ऍलर्जी असणाऱ्या लोकांनी केळी दुधासोबत खाणे टाळले पाहजे. यामुळे आरोग्य समस्या होऊ शकतात.
-
पोटाच्या किंवा पचनाच्या समस्या असल्यास केळी खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास देखील होऊ शकतो.
-
किडनीच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी पोटॅशियमचे जास्त प्रमाण टाळावे, केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. किडनी केळीमधील पोटॅशियम योग्य प्रकारे फिल्टर करू शकत नाही यासाठी किडनीच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी केळी खाणे टाळावे.
-
आधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. (सर्व फोटो: फ्रीपीक)
-
(सर्व फोटो: फ्रीपीक)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल