-
गुरु हा ग्रह देवतांचा गुरू मानला जातो. गुरु म्हणजे बृहस्पति हा समृद्धी, मान, प्रतिष्ठा, वैभव, ज्ञान आणि गुरु यांचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रह गोचर प्रमाणे वक्री आणि मार्गी देखील होतात.
-
ग्रहांच्या या स्थिती बदलाचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतो. जेव्हा कुंडलीमध्ये गुरूची स्थिती मजबूत असते तेव्हा व्यक्तीला प्रत्येक कार्यात अपार यश मिळतं, असं म्हणतात.
-
यावेळी मान-प्रतिष्ठेचा कारक असलेला बृहस्पति ऑक्टोबर महिन्यात वक्री होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ०९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०१ वाजता वृषभ राशीमध्ये वक्री होणार आहेत.
-
बृहस्पतिच्या अशा हालचालीमुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळणार ते पाहुया…
-
मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरूची वक्री हालचाल फायदेशीर ठरु शकते. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात सतत नफा मिळू शकतो.
-
गुरूची वक्री हालचाल कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नौकरी करणाऱ्या लोकांच्या पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ ठरु शकतो.
-
देवगुरुच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला या काळात मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. करिअर आणि व्यवसायात तुमची प्रगती होऊ शकते. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पैसाच पैसा! ४८ तासांनंतर या ३ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! शक्तिशाली गजकेसरी राजयोग निर्माण होणार, प्रगती होण्याचा योग