-
चेहऱ्यावरील मृत पेशी त्वचेच्या बाहेरील थरावर अनेकदा खडबडीत, कोरड्या किंवा फ्लॅकी पॅचच्या रूपात दिसतात. जेव्हा त्वचेमध्ये हायड्रेशन नसतं तेव्हा त्वचा कोरडी होऊ लागते. ज्यामुळे चेहऱ्यावर अतिरिक्त मृत पेशी निर्माण होतात ज्यामुळे त्वचा कोरडी देखील दिसू लागते. जाणून घेऊया चेहऱ्यावरील मृत पेशी कमी करण्यासाठी काही उपाय.
-
तुम्ही घरी शुगर स्क्रब तयार करू शकता. यासाठी २ चमचे साखर ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. नंतर तुम्ही हे कोमट पाण्याने धु शकता यामुळे तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचा आणखी तेजस्वी होते.
-
तुम्ही लिंबाच्या रसासोबत मीठ समान प्रमाणात मिसळून हे मिश्रण त्वचेवर लावू शकता यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी कमी होतात.
-
तुम्ही २ चमचे ओटचे पीठ पाण्यात मिसळून एक पेस्ट बनवून त्वचेवर लावू शकता याने त्वचेचे एक्सफोलिएशन होण्यास मदत होते.
-
तुम्ही नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये कॉफी मिसळून त्यावचे स्क्रब त्यावर करू शकता. कॉफीचे स्क्रब चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी करण्यास मदत करते.
-
चेहऱ्यावर काकडी लावल्याने देखील त्वचेचा कोरडेपणा होतो.
-
चेहऱ्यावर केळीसोबत मधाचा मास्क लावल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन त्वचा आणखी तेजस्वी होते.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.
-
(सर्व फोटो : फ्रीपीक)

अखेर मुसक्या आवळल्या, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी केली अटक