-
अनेकदा असे म्हटले जाते की साखर आरोग्यासाठी फायदेशीर नाही आणि ती खाल्ल्याने शरीराला नुकसान होऊ शकतं. पण साखर आपल्या आरोग्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे.
-
साखर आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करते, ज्यामुळे आपल्याला आपली दैनंदिन कामे करण्याची शक्ती मिळते. यासाठी तुम्ही साखरेऐवजी गुळाला देखील आहारात समाविष्ट करू शकता. कारण साखरेपेक्षा गूळ जास्त आरोग्यदायी मानला जातो. जाणून घेऊया गूळाचे आरोग्यदायी फायदे.
-
गुळामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखी महत्त्वपूर्ण खनिजे असतात, जी शरीरासाठी आवश्यक असतात. याचबरोबर साखरेमध्ये या पोषक तत्वांची कमी असते, कारण साखर फक्त कॅलरीज पुरवते.
-
गुळामुळे पचन सुधारतात आणि हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.
-
गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा कमी असतो, म्हणजेच गुळामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रत राहते तर साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी लगेच वाढते आणि दीर्घकाळासाठी आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
-
उसाचा रस उकळून गूळ बनवला जातो आणि त्यावर कमीत कमी प्रक्रिया केली जाते.
-
साखर बनवण्यासाठी अनेक रासायनिक प्रक्रिया केल्या जातात, त्यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात. यासाठी साखरेपेक्षा गूळ आरोग्यसाठी जास्त चांगला आहे.
-
गुळामुळे झोपेची समस्या दूर होते. गुळामध्ये सेरोटोनिन आणि मेलाटोनिन सारखे घटक असतात जे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास आणि मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतात.
-
(फोटो स्त्रोत: पेक्सेल्स आणि फ्रीपिक)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल