-
ऑफिसमध्ये ८ ते ९ तासांची शिफ्ट असते. अशावेळी भूक लागणे स्वाभाविक आहेत. मग, यावेळी काय खायचं हे आपण ठरवू लागतो. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
मग भूक लागली की आपण चिप्स किंवा तळलेल्या पदार्थांना प्रामुख्याने निवडतो. पण, हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहेत का हे आपण विसरून जातो. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
अन्नामध्ये प्रोटीन कमी असल्यास अनेकदा भूक लागते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तर तुम्ही काम करत असताना तुमच्या डेस्कवर किंवा बॅगेत पुढील पदार्थ नक्की ठेवा… (फोटो सौजन्य : @Freepik)
-
ड्रायफ्रूट्स : बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता यांसारखे ड्रायफ्रूट्स हे कुरकुरीत स्नॅक्स पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत जे आरोग्यासाठी असंख्य फायदे देतात. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
फळे : जास्त प्रमाणात साखर असणारे पदार्थ खाण्याऐवजी जीवनसत्त्व, अँटिऑक्सिडंट्सचे चांगले स्त्रोत असणारी फळे खा. त्यासाठी ऑफिसच्या वेळेत तुम्ही केळी, काकडी, सफरचंद, द्राक्षे हे आरोग्यदायी पर्याय निवडू शकता. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
मखाना : जर तुम्हाला काही चवदार पदार्थ खाण्याची इच्छा असेल चिप्स ऐवजी मखाना हा पर्याय बेस्ट ठरेल. मखाना हा चटपटीत असला तरीही त्यात कॅलरी कमी व प्रथिने जास्त असतात. (फोटो सौजन्य : @loksatta.com)
-
ओट्स व बाजरीचे कुकीज : ओट्स, बाजरीचे कुकीज खा. कारण – त्यात साखरेचे प्रमाण कमी असते आणि ते पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
ग्रीक योगर्ट – ग्रीक दहीमध्ये कॅलरीज कमी असतात. पण, त्यात फायदेशीर प्रोबायोटिक्स देखील असतात ; जे आतड्याच्या चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन देतात. (फोटो सौजन्य : @Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”