-
अनेक वर्षांपासून आपण आपल्या आजी-आजोबांना आणि वडिलधाऱ्यांना मोतीबिंदू झालेला पाहिला आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अनेक लोकांना असलेल्या गैरसमजानुसार मोतीबिंदू हा केवळ वृद्धापकाळात होणारी समस्या आहे, पण तरुणांनादेखील मोतीबिंदू होऊ शकतो अशा अनेक बातम्या हल्ली समोर येत असतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यामुळे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे की, या आजाराची मुख्य कारणे कोणती आहेत आणि तुम्हाला तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काय करायला हवे; जेणेकरून भविष्यात मोतीबिंदूचा धोका उद्भवणार नाही. (फोटो सौजन्य: Freepik)
-
‘द इंडियन एक्स्प्रेस’ने डोळ्यांची स्वच्छता राखण्यासाठी आणि डोळ्यांची काळजी घेण्याच्या बाबतीत काय करावे आणि करू नये, याबाबत माहिती मिळवली आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
डॉ. दीप्ती मेहता, सल्लागार नेत्रतज्ज्ञ, केअर हॉस्पिटल्स हायटेक सिटी, हैदराबाद यांनी सांगितले की, “आपल्या डोळ्यातील लेन्स सामान्यतः दृष्टीस मदत करण्यासाठी स्पष्ट असतात. जसजसे वय वाढत जाते आणि आपण ४० च्या आसपास पोहोचतो तेव्हा लेन्समधील प्रथिने तुटायला लागतात. त्यामुळे लेन्सला अस्पष्ट दिसू लागते. ज्याचे दृष्टी बाधित होऊ शकते.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
नियमितपणे डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वारंवार डोळ्यांची तपासणी करा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुमच्या डोळ्यांना UV किरणांपासून संरक्षण द्या आणि घराबाहेर असताना तीव्र प्रकाश रोखण्यासाठी सनग्लासेस वापरा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
धूम्रपान करत असाल तर ते बंद करा आणि अल्कोहोलचा वापर कमी प्रमाणात करा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मोतीबिंदूच्या रुग्णांसाठी व्हिटॅमिन-सी युक्त आहार करण्याचा सल्ला दिला जातो आणि तुमच्या डोळ्यांवर जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश