-
वजन कमी करण्यासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य आहार घेणे. जर तुम्ही दिवसाची सुरुवात लो-कॅलरी नाश्त्याने केली तर त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते. जाणून घेऊया लो कॅलरी नाश्त्याचे पर्याय, जे खाल्ल्याने तुमचे आरोग्य देखील चांगले राहील आणि तुमचे वजन वाढणार नाही.
-
ओट्समध्ये भरपूर फायबर असते, ओट्स खाल्ल्याने भूक नियंत्रित राहते. हे पचनसंस्थेला निरोगी ठेवते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. -
स्प्राउट्समध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असतात आणि प्रथिने आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. हे तुम्हाला सारखं भूक लागण्याच्या सवयीपासून रोखते आणि वजन कमी करण्यास मदत करते. -
पोहे हा हलका, पौष्टिक आणि झटपट बण्यासारखा नाश्ता आहे आणि यामध्ये कमी कॅलरी असतात. -
रव्यापासून बनवलेल्या उपमामध्ये कॅलरी कमी आणि फायबर भरपूर असते. यामधील वापरलेल्या भाज्या त्याला अधिक पौष्टिक बनवतात. हे वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे.
-
मुगाच्या डाळीपासून बनवलेले डोसे हे प्रथिनांनी समृद्ध असते आणि ते खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेलं राहतं. नाश्त्यामध्ये याचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
-
वजन कमी करण्यासाठी ओट्स इडली हा उत्तम नाश्ता आहे. ओट्समध्ये फायबर आणि प्रोटीन असते, जे वजन नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे.
-
नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम आणि फायबर असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. नाचणी डोसा हा नाश्त्यासाठी एक पौष्टिक आणि चवदार पर्याय आहे, जो तुम्ही लो-कॅलरी नाश्ता म्हणून खाऊ शकतात.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.(सर्व फोटो: फ्रीपीक)

२८ फेब्रुवारी राशिभविष्य: महिन्याचा शेवटचा दिवस ‘या’ तीन राशींचे भाग्य पालटणार? कोणाला कामातून आनंद तर कोणाला अनपेक्षित लाभ होणार