-
चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अनेकदा वेग वेगळ्या घरगुती टिप्सचा उपयोग केला जातो पण काही कोरियन घरगुती उपाय त्वचेला अधिक तेजस्वी आणि चमकदार बनवण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊया अशा एका घरगुती कोरियन उपायाबाबत.
-
तांदळाच्या पाण्याचा स्प्रेमुले केसांसह त्वचेलाही फायदे मिळतो. तांदळाचे पाणी नैसर्गिक टोनरचे काम करते यामुळे त्वचा हायड्रेट होऊन पण चेहरा अधिक तेजस्वी होतो.
-
तांदळाच्या पाण्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे त्वचेला पोषण देऊन त्याला अधिक चमकदार करण्यास मदत करतात. हे घरी बनवणे खूप सोपे आहे.
-
तांदळाचे पाणी बनवण्यासाठी तांदूळ चांगले धुऊन घ्या. तांदूळ पाण्याने नीट धुऊन झाल्यावर एका भांड्यात दोन कप स्वच्छ पाणी घेऊन त्यात तांदूळ भिजवा.
-
साधारण तीन तासांनंतर हे पाणी गाळून घ्या आता हे पाणी २४ ते ४८ तास झाकून ठेवा. असे केल्याने त्यातील पोषक घटक वाढतात.
-
आता हे पाणी एका स्प्रेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास त्याचा ताजेपणा टिकून राहील आणि थंड तांदळाचे पाणी त्वचेसाठीही फायदेशीर ठरेल.
-
तुम्ही हे तांदळाचे पाणी हायड्रेटिंग फेस मास्क, नैसर्गिक टोनर आणि मेकअप रिमूव्हर म्हणून वापरू शकता.
-
हे तांदळाचे पाणी तुम्ही केसांसाठीही वापरू शकता. केसांना लावण्यासाठी, तुम्ही शॅम्पू केल्यानंतर, अर्धा तास केसांवर तांदूळ पाण्याचा मास्क लावू शकता.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

वेश्याव्यवसायातून महिलेची १५ वर्षांनी झाली सुटका, घरी पोहोचताच कुटुंबियांनी…