-
जीवे मारण्याची धमकी
देशातील प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. सिंगापूरमध्ये रामकथा करत असताना त्यांना ही धमकी मिळाली. त्यांनी इंदिरापुरम पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशा परिस्थितीत, कुमार विश्वास यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया (Photo- Dr. Kumar Vishwas/FB) -
लाखो रुपये मानधन
कुमार विश्वास कविता आणि कथा वाचण्यासाठी देशभरात तसेच जगभर प्रवास करतात. कवी संमेलन आणि कथेसाठी ते लाखो रुपये मानधन घेतात. त्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. (Photo- Dr. Kumar Vishwas/FB) -
दरवर्षी किती कमावतात?
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कुमार विश्वास यांनी दिलेल्या त्यांच्या मालमत्तेच्या तपशीलात त्यांची एकूण संपत्ती ३,८२,००,८०५ रुपये होती. मात्र, गेल्या काही वर्षांत त्याची संपत्ती आणखी वाढली असावी. (Photo- Dr. Kumar Vishwas/FB) -
घरात लाखोंचे सोने
myneta.info वेबसाइटनुसार, कुमार विश्वास यांच्या घरात २६ लाख रुपयांचे दागिने आहेत. कुमार विश्वास आणि त्यांच्या पत्नीकडे १ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता असून त्यात शेतजमीन, बिगरशेती जमीन आणि निवासी घराचा समावेश आहे. (Photo- Dr. Kumar Vishwas/FB) -
घराचे वेगळेपण
कुमार विश्वास ज्या घरात राहतात ते घर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता पारंपरिक भारतीय शैलीत बांधण्यात आले आहे. ज्या ठिकाणी त्यांचे घर आहे, तेथे मोठ्या प्रमाणात जमीन आहे ज्यामध्ये ते शेती करतात. गाझियाबादजवळील पिलखुवा येथे त्यांचे घर आहे, ज्याला त्यांनी ‘केव्ही कुटीर’ असे नाव दिले आहे. (Photo- Dr. Kumar Vishwas/FB) -
या गोष्टींपासून बनवले घर
कुमार विश्वास यांनी त्यांच्या घराच्या भिंतीवर सिमेंटचा नव्हे तर वैदिक प्लास्टरचा वापर केला आहे. हे पिवळी माती, वाळू, शेणखत, खाण्यासाठी अयोग्य अशा कडधान्याचे पावडर, चुना आणि चिकट झाडांचे अवशेष (आवळा, लसोडा, गुलर शिशम इ.) यांचे मिश्रण करून तयार केले जाते. (Photo- Dr. Kumar Vishwas/FB) -
वैदिक काळातील तंत्रज्ञान
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कुमार विश्वास यांचे हे घर अँटी-बॅक्टेरियल आणि तापमान नियंत्रित आहे. कडक उन्हाळ्यातही या घराचे तापमान थंड राहते. कुमार विश्वास यांनी याबद्दल सांगितले आहे की त्यांनी पूर्वजांच्या वास्तुकलेचे पुनरुज्जीवन केले आहे. जुन्या काळी अशा प्रकारे घरे बांधली जात होती. (Photo- Dr. Kumar Vishwas/FB) -
कल्पना कशी सुचली?
कुमार विश्वास यांना एका पुस्तकातून हे घर बांधण्याची कल्पना सुचली. फार पूर्वी त्यांनी भारतीय स्थापत्यशास्त्रावर ई.बी. हॉवेल यांचे पुस्तक वाचले होते. ज्यामध्ये अशा भारतीय घरांचा उल्लेख होता. तेव्हापासून त्यांनी ठरवले होते की, जेव्हाही घर बांधायचे तेव्हा ते जुन्या शैलीत बांधायचे. (Photo- Dr. Kumar Vishwas/FB) -
घरात काय आहे?
कुमार विश्वास यांच्या घरात एक मोठी लायब्ररी आणि रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे जिथे ते व्हिडिओ रेकॉर्ड करतात. केव्ही कुटीरच्या समोर एक मोठा तलाव आहे ज्यात बदकांपासून माशांपर्यंत सर्व काही आहे. त्याचबरोबर कुमार विश्वास हे पशुपालन आणि शेतीही करतात. ते अनेक प्रकारची सेंद्रिय फळे, भाज्या आणि औषधी वनस्पती पिकवतात. (Photo- Dr. Kumar Vishwas/FB)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO