-
निरोगी आणि चमकणारी त्वचा प्रत्येकाला हवी असते आणि यासाठी आपण अनेकदा वेगवेगळ्या स्कीन केअर टिप्स किंवा घरगुती उपाय करतो. पण कधी आपल्या दिनचर्यातील काही सवयी देखील आपल्या त्वचेला निरोगी ठेवू शकतात.
-
जाणून घेऊया अशा सोप्या पद्धती ज्यामुळे त्वचा अधिक निरोगी आणि चमकदार होऊ शकते.
-
जास्त साखरेचे सेवन शरीरातील ग्लायकेशन वाढवते यामुळे त्वचेवर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. निरोगी त्वचेसाठी साखरेचे सेवन नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे.
-
निरोगी त्वचेसाठी आठवड्यातून किमान ३ दिवस व्यायाम करणे आवश्यक आहे. शारीरिक हालचालीमुळे रक्ताभिसरणाला चालना देण्यास मदत होते, ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या पेशींना अधिक ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये मिळू शकतात. याशिवाय, जेव्हा रक्ताभिसरण सुधारते, तेव्हा त्वचेतील कोलेजनची पातळी देखील वाढते आणि तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.
-
निरोगी त्वचेसाठी दररोज किमान ७ ते ९ तास झोप घेणे महत्वाचे आहे. झोपेच्या वेळी शरीरात नवीन कोलेजन तयार होतात ज्यामुळे तणावामुळे होणारे त्वचेचे नुकसान कमी होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी दररोज किमान ७ ते ९ तासांची झोप घ्या.
-
त्वचेची काळजी घेण्यासाठी उन्हापासून संरक्षण देखील सर्वात महत्त्वाचे आहे. कारण सूर्यापासून निघणाऱ्या हानिकारक किरणांमुळे त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणे झपाट्याने वाढू शकतात यासाठी घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करा.
-
निरोगी त्वचेसाठी तणाव टाळणे आवश्यक आहे. दीर्घकालीन तणावामुळे शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढते, ज्यामुळे मुरुम, एक्जिमा आणि सोरायसिस सारख्या समस्या देखील वाढू शकतात यासाठी जास्त ताण घेणे टाळा.
-
अधिक माहितीकरीता तज्ञांचा सल्ला घ्या.
-
(सर्व फोटो: अनस्पलॅश)

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?