-
सध्या पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे पण जुनी राजधानी कुठे होती माहीत आहे का? केवळ पाकिस्तानच नाही तर जगातील इतर अनेक देश आहेत ज्यांनी आपली राजधानी बदलली आहे. या देशांच्या जुन्या आणि नवीन राजधानीची नावे काय आहेत ते जाणून घेऊया. (Photo- Pexels)
-
1- नायजेरिया
लागोस ही नायजेरियाची राजधानी होती. १९९१ मध्ये देशाने राजधानी अबुजा येथे हलवण्यात आली. (Photo- Pexels) -
2- म्यानमार
ज्या देशांनी आपली राजधानी बदलली आहे त्यात म्यानमारचाही समावेश आहे. पूर्वी या देशाची राजधानी यंगून होती आणि आता ती नायपीडाव आहे. (Photo- Pexels) -
3- रशिया
सेंट पीटर्सबर्ग ही रशियाची राजधानी असायची. रशियाने १९१८ मध्ये आपली राजधानी बदलून मॉस्को केली. (Photo- Pexels) -
4- पाकिस्तान
भारतापासून वेगळे झालेल्या पाकिस्तानची राजधानी कराची होती, सन १९६८ मध्ये पाकिस्तानने इस्लामाबादला त्यांची अधिकृत राजधानी बनवले. (Photo- Pexels) -
5- ब्राझील
ब्राझीलनेही आपली राजधानी बदलली आहे. या देशाची जुनी राजधानी रिओ दी जानेरो होती आणि आता ब्राझीलिया आहे. (Photo- Pexels) -
6- कझाकस्तान
अल्माटी ही पूर्वी कझाकस्तानची राजधानी होती. अस्तानाला नंतर देशाची अधिकृत राजधानी बनवण्यात आले. (Photo- Pexels) -
7- टांझानिया
या यादीत टांझानियाचाही समावेश आहे. पूर्वी दार एस सलाम ही राजढाई होती, आता दोडोमा ही या देशाची राजधानी आहे. (Photo- Pexels) -
8- आयव्हरी कोस्ट
या देशाची जुनी राजधानी अबिदजान होती आणि आता ती यामोसौक्रो आहे. (Photo- Pexels)
हेही वाचा-उत्तर प्रदेशबद्दल तुम्हाला किती माहिती आहे, जुने नाव काय होते? राज्यात दुसऱ्या क्रमां…

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”