-
जगातील महान शरीरसौष्ठवपटू ‘इलिया गोलेम येफिमचिक’चे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बॉडीबिल्डरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे.
-
त्याच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, गोलेमला मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आले.
-
मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच ते कोमात गेले होते, त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. या बेलारशियन बॉडीबिल्डरचे शरीर अतिशय आकर्षक आणि प्रचंड तगडे होते. त्याचे वजन ३४० पौंड (१५४ किलो) आणि उंची ६ फूट १ इंच होती.
-
त्याची छाती ६१ इंच आणि बायसेप्स २५ इंचाचे होते, जी सामान्य माणसापेक्षा खूप जास्त होती. गोलेम त्याच्या दैनंदिन दिनचर्येत दिवसातून सातवेळा जेवण करत असे, ज्यामध्ये १६,५०० कॅलरींचा समावेश होता. त्यात २.५ किलोग्राम मांसाहार आणि सुशीचे १०८ तुकडे असायचे. (सुशी ही एक जपान देशातील डिश आहे.)
-
गोलेम येफिमचिकचे मोठे शरीरच त्याच्या मृत्यूचे कारण बनल्याचे सांगितले जात आहे. या बॉडीबिल्डरला ‘म्युटंट’ म्हणूनही ओळखले जात होते. दरम्यान, अलीकडच्या काळात, जिममध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे, मग तो सेलीब्रिटी असो किंवा सामान्य माणूस.
-
कधीकधी बॉडीबिल्डर्समध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण खूप जास्त स्टिरॉइड्स घेणे किंवा जास्त ट्रेनिंग असू शकते. शरीरातील हृदयाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करणे हे देखील यामाचे एक प्रमुख कारण असू शकते.
-
काही प्रकरणांमध्ये, डिहायड्रेशन आणि खराब आहार देखील यासाठी जबाबदार आहे. तुम्हीही बॉडी बिल्डिंग करत असाल आणि जिममध्ये जात असाल तर हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी तुमचा आहार निरोगी ठेवा. व्यायामासोबतच प्राणायाम करण्याचाही प्रयत्न करा.
-
जंक आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवा. धूम्रपान आणि दारू पिणे टाळा. याशिवाय, हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी, तुम्हाला तुमचा ताण कमी करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत व्यायामासोबतच प्राणायाम करण्याचा प्रयत्न करा.
(फोटो स्त्रोत: ILLia GOLEM फॅनपेज/फेसबुक)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…