-
गरोदर स्त्रिया बाळ सुदृढ जन्माला यावे यासाठी अनेक पौष्टिक पदार्थांचे सेवन करतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यात काही जण गर्भवती महिलांनी दुधात केशर टाकून प्यावे. मग गोरे बाळ जन्माला येते, असा सल्ला देतात. पण, हा सल्ला खरेच योग्य आहे का? (फोटो सौजन्य: Freepik)
-
या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. सुरभी सिद्धार्थ (सल्लागार आणि प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, खारघर) यांनी सांगितले, “केशरामध्ये बाळाच्या त्वचेचा रंग सुधारतील असे कोणतेही गुणधर्म नसतात. केशर अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण असते आणि त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
“तसेच ते आई आणि बाळ अशा दोघांचेही आरोग्य उत्तम ठेवू शकते. त्यामुळे गर्भवती महिलांनी केशराचे सेवन केल्यास, त्याचा आरोग्याला अधिक फायदा होऊ शकतो.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
डॉ. सीमा शर्मा (सल्लागार, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, अपोलो क्रॅडल चिल्ड्रन हॉस्पिटल, मोती नगर, नवी दिल्ली) यांनी सांगितले, “त्वचेचा रंग आनुवंशिक घटकांवर अवलंबून असतो. गर्भधारणेदरम्यान विशिष्ट पदार्थांच्या सेवनाने बाळाचा रंग गोरा होत नाही.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
प्रसूती शिक्षिका राधिका कल्पथरू यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “केशराच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते; जी गरोदरपणात कमकुवत होते. त्यामुळे दुधात किंवा डाळीमध्ये केशर मिसळल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेसह पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
कल्पथरूने यांनी सांगितले, “केशरमध्ये अवसादविरोधी घटक असतात; जे मूड स्विंग होणे आणि मानसिक तणाव नियंत्रित करतात. त्यामुळे आई आणि बाळ आनंदी राहते.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
कल्पथरू यांच्या मते, “गर्भधारणेमुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते. ते लक्षात घेता, केशराचे नियमित सेवन केल्याने तुम्ही ॲलर्जीपासून सुरक्षित राहाल आणि हवामानातील बदल आणि इतर सामान्य संक्रमणांमुळे तुमचे संरक्षण होईल. त्यामुळे तुम्ही स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने मध्यम प्रमाणात केशराचे सेवन केल्यास, गर्भधारणेदरम्यान ते आई आणि बाळासाठी खूप फायदेशीर ठरेल.”(फोटो सौजन्य: Freepik)
-
डॉ. सुरभी यांनी सांगितले, “दुधात केशराच्या दोन-तीन काड्या टाकाव्यात. पण, केशरयुक्त दूध पिणे ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड असेल. केशरामुळे गर्भवती महिलांना मळमळ, चिंता आणि नाकातून रक्त येणे यांसारखे दुष्परिणामांचाही त्रास होऊ शकतो. म्हणून सावधगिरी बाळगा आणि जोपर्यंत तज्ज्ञ तुम्हाला सांगत नाहीत तोपर्यंत त्याचे सेवन करू नका.” (फोटो सौजन्य: Freepik)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”