-
सतत खाज येणे यासारख्या त्वचेच्या समस्या सहसा खूप त्रासदायी असतात आणि आरोग्यावर परिणाम करू शकतात. हे संसर्ग टॉवेल, केसांचा ब्रश, कंगवा आणि कपड्यांमधूनही पसरते. हा बुरशीजन्य संसर्ग पावसात भिजल्याने आणि बराच वेळ पाण्यात राहिल्यानेही अनेकांना होऊ शकतो.
-
कधी हार्मोनल चेंज, खाण्याच्या सवयींमध्ये यांसह अनेक कारणांमुळे खाज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या कारणांमध्ये शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता देखील समाविष्ट आहे. काही जीवनसत्त्वांच्या कमतरतेबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे या समस्या उद्भवू शकतात.
-
शरीरात व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होते, ज्यामुळे तुम्हाला खाज येण्याची समस्या होऊ शकते. याशिवाय, यामुळे त्वचेवर बारीक रेषा आणि सुरकुत्या देखील येऊ शकतात. शरीरात व्हिटॅमिन ए वाढवण्यासाठी अंडी किंवा लोणी यांसारख्या पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. -
व्हिटॅमिन बी-3 ला ‘नियासिन’ असेही म्हणतात. शरीरात त्याच्या कमतरतेमुळे खाज सुटणे, पुरळ उठणे आणि जखमा होऊ शकतात. विशेषत: सूर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कामुळे अशा प्रकारची समस्या उद्भवू शकते. शरीरातील व्हिटॅमिन बी-3 प्रमाण वाढवण्यासाठी चिकन, मटार, मासे, मशरूम, ब्रोकोली आणि बदाम यांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
-
शरीरात व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला खाज येण्याची समस्या देखील होऊ शकते. यामुळे तुम्हाला अशक्तपणा आणि हात सुन्न होणे यासारख्या इतर समस्या होतात. हळूहळू या समस्या तुमच्या त्वचेवरही परिणाम करू शकतात. -
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच व्हिटॅमिन सी जखमा भरण्यासही मदत करते. शरीरात त्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होऊ शकते आणि ज्यामुळे खाज येण्याची समस्या वाढते. -
व्हिटॅमिन डी त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असते तेव्हा त्वचा कमकुवत होते आणि बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य संक्रमणास बळी पडते. सूर्यकिरणांपासून आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळते आणि ते त्वचेला संसर्गापासून वाचवण्यास मदत करते.
-
व्हिटॅमिन ईमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. व्हिटॅमिन ई त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे त्वचा सुरक्षित ठेवते. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे खाज येण्यासारख्या समस्या वाढू शकतात, कारण त्वचेचा संरक्षणात्मक स्तर कमकुवत होतो. (फोटो स्त्रोत: फ्रीपिक)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख