-
तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी प्यायल्याने किंवा लिंबू पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासून लढण्याची शक्ती मिळते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
या संदर्भातील माहिती सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत असते. पोषणतज्ज्ञ ल्युक कॉउटिन्हो सांगतात, “याच सवयी जेव्हा जास्त प्रमाणात दैनंदिन आयुष्यात आणल्या जातात तेव्हा त्याचा घातक परिणामही आरोग्यावर होऊ शकतो.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
आहारतज्ज्ञांनी नीलांजना यांनी सांगितले की, “तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यासाठी वापरल्यास अनेक फायदे होऊ शकतात; परंतु ते जास्त प्रमाणात प्यायल्यास विषबाधा होऊ शकते. दररोज एक किंवा दोन ग्लास अधिक प्यायल्याने तांब्यातील विषारीपणा, गॅस्ट्रोइंटेस्टायनल त्रास, यकृत खराब होणे व न्यूरोलॉजिकल यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.“(फोटो सौजन्य: Freepik)
-
नीलांजना यांच्या मते, या गरम केलेले पाणी किंवा लिंबू मिसळलेले पाणी तांब्याच्या भांड्यातून पिण्यास नकार देतात. “गरम पाणी किंवा लिंबाचा रस घातलेले पाणी तांब्याच्या भांड्यात ओतल्यास ही बाब रासायनिक अभिक्रियांना जन्म देऊ शकते. कारण- तांब्याचे गुणधर्म अम्लीय पदार्थांद्वारे (लिंबासारखे) बदलू शकतात किंवा उष्णतेमुळे अशा प्रकारे तांबे धातूपासून जे क्षार तयार होतात, ते शरीरासाठी मोठ्या प्रमाणात हानिकारक असतात.” (फोटो सौजन्य: Indian express)
-
नीलंजना यांच्या मते, “जर तांब्याच्या भांड्यात गरम पाणी किंवा लिंबाचा रस घातला, तर तांबे धातूमुळे अॅसिटेट आणि कॉपर कार्बोनेट यांसारखी विषारी संयुगे तयार होऊ शकतात.” त्याच्या सेवनामुळे इतर आरोग्यविषयक समस्या गंभीर गॅस्ट्रोइंटेस्टायनल गडबड होऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
नीलांजना सांगतात, “गर्भवती महिलांनी काळजी घ्यायला हवी की, तांब्याच्या भांड्यातील जास्त पाणी पिणे गर्भातील बाळाच्या वाढीवर परिणाम करू शकते.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्या म्हणतात की, बाळावर तांब्याच्या विषबाधेचा जास्त परिणाम होतो. कारण- त्यांचे शरीर लहान आकाराचे असते आणि त्यांच्या शरीराची हळूहळू वाढ होत असते. यकृताच्या रुग्णांनीही तांब्यातील पाण्याचे सेवन मर्यादित केले पाहिजे. कारण- त्यांचे यकृत तांबे डिटॉक्सिफाय आणि उत्सर्जित करण्यात कार्यक्षमतेने कार्य करू शकत नाही. (फोटो सौजन्य: Freepik)
-
चक्रवर्तींनुसार तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे सांगण्यात आले की, तांब्यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म आणि संभाव्य आरोग्य फायदे आहेत. परंतु, ते सर्व रोगांवर उपचार नाही. कर्करोग, मधुमेह किंवा इतर दीर्घकालीन आजार बरे करण्याचे दावे निराधार आहेत. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कोणत्याही पोषक घटकांप्रमाणेच संयम महत्त्वाचा आहे. तांब्याचे जास्त सेवन हानिकारक असू शकते. तसेच तांबे काही जीवाणू नष्ट करू शकतात; परंतु पाणी शुद्धीकरणासाठी ही एक विश्वासार्ह पद्धत नाही. तांब्याच्या भांड्यांमध्ये स्वच्छ, फिल्टर केलेले पाणी वापरणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: unsplash)
अखेर मुसक्या आवळल्या, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी केली अटक