-
गणेशोत्सवातील सर्वात भावूक करणारा क्षण म्हणजे गणपती विसर्जन. कोणी दीड दिवसानंतर तर कोणी तीन दिवसानंतर, कोणी पाच दिवसानंतर तर कोणी सात दिवसानंतर गणपती विसर्जन करतात. काही लोक अनंत चतुर्थीला म्हणजेच दहा दिवसानंतर गणपती विसर्जन करतात. गणपती जसा वाजत गाजत येतो तसा त्याचा निरोप समारंभ सुद्धा तितकाच वाजत गाजत होतो. (Photo : Freepik)
-
सध्या काही ठिकाणी गणपती विसर्जन सुरू झाले आहे. अनेक जण विसर्जन दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत बाप्पााला पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती करत आहे.गणपती विसर्जनाच्या तुम्ही तुमच्या आप्तस्वकीयांना हार्दिक शुभेच्छा देऊ शकता. तुम्ही व्हॉट्सअप, मेसेजद्वारे खालील शुभेच्छा संदेश पाठवू शकता. (Photo : Freepik)
-
कर सर्वांच्या दु:खाचा नाश
चिंतामणी कर सर्वांच्या जीवनात आनंदाची बरसात
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या…
गणपती विसर्जनाच्या मराठी शुभेच्छा (Photo : Freepik) -
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ,
निर्विघ्न कुरू मे देव सर्व कार्येशू सर्वदा
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या… (Photo : Freepik) -
बाप्पा, सर्वांना बुद्धी दे.. हेच आमचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे…
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या… (Photo : Freepik) -
आभाळ भरलं होतं बाप्पा तु येताना
आता डोळ्यांत अश्रु दाटले तू जाताना
चुक भूल पदरात घे अन् पुढच्या वर्षी लवकर ये… (Photo : Freepik) -
सेवा जाणुनी
गोड मानुनी
द्यावा आशीर्वाद आता
निरोप घेतो देवा
आता पुढच्या वर्षी लवकर या… (Photo : Freepik) -
गणपती विसर्जन एक वियोग नाही तर एक नवा आरंभ आहे.
बाप्पा तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे…
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या… (Photo : Freepik) -
बाप्पााच्या दर्शनाने सर्व काही मिळाले
श्रींच्या चरणी कर माझे जुळले
बाप्पा, तुझ्या येण्याने झाला हर्षोल्हास,
काय तुझी अशीच कृपा आमच्यावर राहू दे (Photo : Freepik) -
निरोप देतो देवा आज्ञा असावी..
चुकले आमचे काही देवा क्षमा असावी…
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या… (Photo : Freepik) -
बाप्पा तुझ्या जाण्याने डोळ्यात आले अश्रू
प्लीज बाप्पा आम्हाला नका विसरू
राहू दे तुझी कृपा आमच्यावर
लक्ष दे तुझ्या लेकरांवर..
गणपती बाप्पा मोरया (Photo : Freepik) -
गणपती विसर्जनाच्या मराठी शुभेच्छा
निरोप घेतोय आता तू
तरी आमच्यावर असू दे तुझी कृपा,
गणेशोत्सव हा सण आहे सार्वजानिक एकतेचा
फक्त सर्वांनी माणुसकी जपा.. (Photo : Freepik)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख