-
आपला चेहरा चांगला दिसावा अशी इच्छा प्रत्येकालाच असते. त्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहत असतो. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
स्किनकेअरचा विचार केला, तर प्रत्येकाला दोन सामान्य समस्यांना तोंड द्यावे लागते. पहिलं म्हणजे १. व्हाईटहेड्स व २. ब्लॅकहेड्स. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तर या दोघांमधील फरक आणि घरच्या घरी त्याचा उपचार कसा करायचा, हे समजून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
व्हाईटहेड्स हे लहान, पांढरे किंवा मांसाच्या रंगासारखे दिसतात; जे त्वचेच्या मृत पेशी, तेल, बॅक्टेरिया त्वेचेवरील केसांच्या कूपमध्ये अडकतात तेव्हा तयार होतात. तर व्हाईटहेड्सची छिद्रे बंद असतात. ते दिसायला पांढरा किंवा मांस-रंगाचे असतात, त्यांचा आकार लहान, गोल बंप्ससारखा असतो. हे अनेकदा चेहऱ्यावर, विशेषतः नाक, हनुवटी आणि कपाळावर दिसून येतात. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे : १. टी ट्री ऑइल : टी ट्री ऑइलमध्ये नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध घालणारा गुणधर्म असतो; ज्यामुळे जळजळ कमी होण्यास, मुरुम येणाऱ्या बॅक्टेरिया नष्ट करण्यात मदत करतात. नारळ किंवा जोजोबा तेलसारख्या तेलात टी ट्री ऑइलचे काही थेंब मिसळा आणि कापसाच्या मदतीने ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स असतील तिथे लावा. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
२. बेकिंग सोडा : बेकिंग सोडा एक्सफोलिएंट म्हणून कार्य करते, मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास आणि छिद्रे बंद करण्यास मदत करते. एक चमचा बेकिंग सोडा थोड्या प्रमाणात पाण्यात मिसळून पेस्ट बनवा, नंतर गोलाकार हालचालीत त्वचेवर हळूवारपणे मसाज करा. उबदार पाण्याने स्वच्छ धुवा. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
३. मध : मधामध्ये नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ व दाहक-विरोधी गुणधर्म असतात; जे त्वचेला फ्रेश ठेवतात आणि ब्रेकआउट कमी करण्यास मदत करतात. तर हा मध थेट ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स असणाऱ्या ठिकाणी लावा. १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
४. लिंबाचा रस : लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असते, जे त्वचेला एक्सफोलिएट करण्यास आणि अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करते. तर कापसाच्या मदतीने तुम्ही ताज्या लिंबाचा रस त्वेचवर लावा, १० मिनिटे राहू द्या आणि नंतर स्वच्छ धुवा. नंतर सनस्क्रीन लावा, कारण लिंबाचा रस तुमची त्वचा सूर्यप्रकाशासाठी अधिक संवेदनशील ठरू शकते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
५. एलोवेरा : एलोवेरामध्ये त्वचेवर उपचार करण्याचे गुणधर्म आहेत; हे जळजळ, चेहऱ्यावर येणारी खाज कमी करून त्वचेला थंडावा देण्यास मदत करू शकतात. तर त्वचेवर ज्या ठिकाणी ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स असतात, तेथे एलोवेरा जेल लावा आणि सुमारे २० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर पाण्याने धुवून घ्या… (फोटो सौजन्य : @Freepik)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही