-
आपल्या दैनंदिन आहारात बटरचे अतिसेवन केल्यास आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे वजन वाढणे, वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. पण चांगली गोष्ट अशी आहे की बटरसाठी अनेक आरोग्यदायी पर्याय आहेत, जे केवळ चवदारच नाहीत तर आरोग्यदायी देखील आहेत. चला तर मग बटरच्या ७ सर्वोत्तम आणि आरोग्यदायी पर्यायांबद्दल जाणून घेऊया.
-
ऑलिव्ह ऑइल (Olive Oil)
ऑलिव्ह ऑइलमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि सॅलडसाठी किंवा कोणत्याही स्वयंपाकामध्ये वापरले जाऊ शकते. -
अॅव्हकाडो (Avocado)
अॅव्हकाडो लोण्यासारखे मलाईदार असते. त्यात निरोगी फॅट्स असतात जे हृदयासाठी चांगले असतात आणि ते तुमच्या नाश्त्याच्या टोस्ट किंवा सँडविचवर बटरच्या जागी वापरले जाऊ शकते. -
ग्रीक दही (Greek Yogurt)
ग्रीक दही ही केवळ प्रथिनांनी समृद्ध नाही तर ते लोणीसाठी ही लो-कॅलरी पर्याय देखील आहे. आपण बेकिंगमध्ये लोणीच्या जागी सहज दही वापरू शकता. याशिवाय स्मूदी, सूप किंवा डिप म्हणूनही याचा वापर करता येतो. -
नारळाचे तेल (Coconut Oil)
नारळाच्या तेलामध्ये निरोगी फॅट्स असतात आणि ते चयापचय वाढवण्यास मदत करतात. नारळाचे तेल स्वयंपाकात लोणीला पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते. यामध्ये अँटिऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असल्याने आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. -
नट बटर (Nut Butter)
बदाम, शेंगदाणे किंवा काजूपासून बनवलेले नट बटर प्रथिने आणि निरोगी फॅट्सने समृद्ध असते. हे ब्रेडवर बटरच्या जागी वापरले जाऊ शकते. हे चवदार असण्याबरोबरच आरोग्यदायी देखील आहे. -
हम्मस (Hummus)
चण्यापासून बनवलेला हम्मस केवळ स्वादिष्टच नाही तर प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. शिवाय, हा लो-कॅलरी आणि लो-फॅट्सचा पर्याय देखील आहे. ब्रेडवर लावण्यासाठी बटरचा हा एक चांगला पर्याय आहे. याचा वापर चटणी किंवा डिप म्हणूनही करता येतो. -
तूप (Ghee)
भारतीय जेवणात लोकप्रिय असलेले तूप आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे पचनास मदत करते आणि त्वचेसाठी देखील चांगले असते. यामध्ये काही जीवनसत्त्वे देखील असतात जी शरीरासाठी फायदेशीर असतात. हे लोण्यासारखे मलाईदार असते परंतु यात लोणीपेक्षा कमी फॅट्स असतात. भाज्यांबरोबर किंवा रोट्यावर लावून खाऊ शकतो.

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल