-
अनेक वेळा आपल्याला सकाळी काही खाण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. पण जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमचा नाश्ता अजिबात वगळू नये. यासाठी तुम्ही हे प्रथिनेयुक्त पदार्थ खाऊ शकता. चला जाणून घेऊया या पदार्थांबद्दल.
-
तुम्ही नाश्तामध्ये काळे हरभरे खाऊ शकता जे प्रथिने समृद्ध आहेत आणि हे वजन कमी करण्यास देखील मदत करतात. तुम्ही ते उकळून त्यात कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, लिंबू आणि मीठ मिसळूनही खाऊ शकता.
-
थालीपीटामुळे शरीराला प्रथिने तर मिळतातच शिवाय हे वजन कमी करण्यासही मदत करते. तुम्ही मूग डाळ बारीक करून थालीपीट बनवू शकता आणि नंतर त्यात चीज किंवा टोमॅटो कांदाही टाकू शकता.
-
नाश्त्यात सर्वात सोपा पर्याय म्हणजे ड्राय-फ्रुट्स, तुम्ही सकाळी ड्राय-फ्रुट्स खाऊ शकता. अधिक पोषणसाठी तुम्ही भिजवलेल्या ड्राय-फ्रुट्सचे सेवन करू शकता.
-
अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. जर तुम्ही दररोज अंडी उकडलेली खाल्ली तर तुमच्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळू शकते.
-
स्प्राउट्स म्हणजेच भिजवलेले धान्य, हे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. यामुळे तुमच्या शरीरातील फायबरचे प्रमाण वाढते आणि वजन कमी होण्यास देखील मदत होते. याशिवाय यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असल्याने भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
-
नाश्त्यात चीजचे समावेश केल्याने भूक नियंत्रित राहते इतकेच नाही तर हे चयापचय गती वाढवते ज्यामुळे वजन कमी करण्यास देखील मदत होते.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.
-
(हे ही पाहा: Photos: ‘स्त्री-२’ ठरला भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट; यादीतील इतर बॉक्स ऑफिस हिट पाहा)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य