तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात जनावरांची चरबी मिसळण्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. मंदिरासाठी बनवल्या जाणाऱ्या प्रसादात वापरण्यात येणाऱ्या तुपात जनावरांची चरबी मिसळल्याचे सांगण्यात आले आहे.तुपाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे पण जर त्यात भेसळ असेल तर ती फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरू शकते. चला जाणून घेऊया शुद्ध तूप कसे ओळखायचे?भेसळयुक्त तुपाची चाचणीही मिठाने ही करता येते. यासाठी एका भांड्यात दोन चमचे तूप टाका आणि त्यात अर्धा चमचा मीठ घालून दोन थेंब हायड्रोक्लोरिक ॲसिड टाका, हे मिक्स करून २० मिनिटे सोडा. तुपाचा रंग लाल किंवा इतर कोणताही असेल तर हे तूप भेसळयुक्त आहे.तूप तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पाणी. एक ग्लास पाण्यात एक चमचा तूप टाका. तूप पाण्यात बुडले तर ते भेसळयुक्त आहे. शुद्ध तूप हे पाण्यात तरंगू लागतं.तळहातावर एक चमचा तूप घेऊन चांगले चोळा, नंतर १०-१५ मिनिटांनी त्याचा वास घ्या. शुद्ध तुपाचा एक वेगळाच तीव्र सुगंध असतो. जर त्याला वास नसेल तर ते भेसळयुक्त तूप आहे.एका भांड्यात ३-४ चमचे तूप टाका, ते उकळवा आणि ते भांडं २४ तसंच राहूद्या. जर तुपाचा रंग पिवळा असेल आणि ते पूर्णपणे घट्ट झालं नसेल किंवा त्याचा वास पूर्वीसारखा असेल तर ते शुद्ध आहे.शुद्ध आणि भेसळयुक्त तूप शोधण्यासाठी थोडं तूप वितळवून डब्यात ठेवा आणि त्यात थोडी साखर घालून मिक्स करा. काही वेळ सोडल्यानंतर, ताब्यामधील खालील रंग पहा. जर लाल रंग दिसत असेल तर तुमच्या तुपात भेसळ असू शकते.अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.(फोटो: फ्रीपीक)