-
‘मखाना’मध्ये लोह, फायबर, प्रोटीन आणि कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आढळते. याशिवाय, मखाने ग्लूटेन मुक्त असतात, पण मखानेचे अतिसेवन करणे धोकादायक ठरू शकते.
-
मखानाच्या सेवनामुळे अनेक आरोग्य समस्या होऊ शकतात. जाणून घेऊया मखानाचे सेवन केल्यास होणाऱ्या आरोग्य समस्यांबाबत.
-
मधुमेही रुग्णांनी आरोग्य मखानाचे जास्त सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. मखानेच्या अतिसेवनाने इन्सुलिनची पातळी वाढू शकते. मधुमेही रुग्णांनी मखाने खाण्यापूर्वी नक्कीच तज्ञांचा सल्ला घ्यावा.
-
किडनीशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी मखानाचे सेवन टाळावे. यामधील पोटॅशियमचे प्रमाण किडनीवर गंभीर परिणाम करू शकतात.
-
बद्धकोष्ठता आणि सूज यासारख्या पोटाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांना मखानाचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. याचे सेवन केल्याने पोटफुगी होऊ शकते.
-
मखानामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळे त्याचे जास्त सेवन केल्याने पोटदुखी होऊ शकते.
-
गर्भधारणेदरम्यान मखाने खाण्यापूर्वी महिलांनी एकदा तज्ञांचा सल्ला घ्यावा. जास्त खाल्ल्याने पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. यासोबतच रक्तातील साखरेची पातळीही कमी होऊ शकते.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.
-
(सर्व फोटो: फ्रीपीक)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख