-
भाज्यांपासून बनवलेले रायते वजन कमी करण्यास मदत करतात. तुम्ही ब्रोकोली, मटार, गाजर आणि पालक यांसारख्या भाज्या उकळून दह्यामध्ये मिसळून रायता बनवू शकता.
-
भोपळ्याचा रायता वजन लवकर कमी करण्यास मदत करतो. फक्त भोपळा कापून, उकळून त्याला मॅश करा. नंतर दह्यात मिसळून त्याचा रायता तयार करा. तुम्ही त्यात हिरवी मिरची आणि इतर मसाले टाकू शकता.
-
वजन कमी करण्यासाठी तुम्ही बीटरूट रायता खाऊ शकता यासाठी बीटरूट किसून दह्यात मिसळा. तुम्ही त्यामध्ये जिरेपूड, मिरपूड आणि मीठ देखील टाकू शकता.
-
तुम्ही काकडीचा रायता देखील खाऊ शकता जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. हे चयापचय वाढवण्यासाठी आणि पचन गती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
-
दुधी रायता शरीराला हायड्रेट करण्यासोबतच वजन कमी करण्यास मदत करू शकते. त्यातील फायबर चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत करू शकते.
-
अननसचा रायता वजन लवकर कमी करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्हाला फक्त अननस कापून त्यामध्ये दही, मीठ, जिरेपूड, काळी मिरी आणि चाट मसाला मिसळू शकता. हा फायबर युक्त रायता वजन कमी करण्यास मदत करतो.
-
पुदिना हा वजन कमी करण्यास मदत करू शकतो. पचवण्यासोबतच चयापचय वेगवान होण्यासाठी पुदिना उपयुक्त आहे. तुम्ही दह्यात पुदिन्याची पाने चिरून रायता बनवून खाऊ शकता.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

१०० वर्षांनंतर शनी गोचर अन् सूर्यग्रहणाचा दुर्मीळ संयोग, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा; करिअर, व्यवसायात चमकेल नशीब