-
रात्री झोपताना तुम्हालाही दूध पिण्याची सवय आहे का? आयुर्वेददेखील झोपण्यापूर्वी दूध पिण्याची शिफारस करते. पण, घश्याच्या संबंधित आजारांना लक्षात ठेवून… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, तुम्ही दुधात गूळ मिक्स केल्यास हे एक नैसर्गिक पॉवरहाऊस ठरते. कारण हे प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होऊ शकते.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
दूध व गूळ प्यायल्याने ॲनिमिया / रक्ताल्पता बरा होण्यास, गॅस्ट्रिक समस्या दूर होण्यास मदत होते. एकूणच तुमचे आतडे निरोगी ठेवायचे असेल, आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर हा एक सोपा मार्ग आहे; असे एका सोशल मीडिया पोस्टमध्येसुद्धा लिहिण्यात आले आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने आयुर्वेद अभ्यासक डॉक्टर डिंपल जांगडा यांच्याशी चर्चा केली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दुधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे एक अमिनो आम्ल असते; जे सेरोटोनिन, मेलाटोनिन हार्मोन्स सोडून चांगली झोप लागण्यास मदत करू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तसेच दूध उच्च दर्जाचे प्रथिनेदेखील प्रदान करते; जे स्नायूंच्या दुरुस्ती आणि त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. दुधामध्ये बी१२, डी सारख्या जीवनसत्त्वांची उपस्थिती मज्जातंतूंच्या कार्यास, हाडांच्या आरोग्यास समर्थन देतात,” असे डॉक्टर डिंपल जांगडा म्हणाल्या आहेत.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
गूळ हा साखरेला एक आरोग्यदायी व उत्तम पर्याय आहे. कारण ते मिनरल्स, जीवनसत्त्वांच्या स्वरूपात पोषण टिकवून ठेवतात. गूळ पाचन अग्नीलादेखील उत्तेजित करतो आणि कफ संतुलित करण्यास मदत करतो. गूळ हे न पचलेले अन्न, आतड्यात साचलेल्या विषारी पदार्थांना शरीराबाहेर काढून टाकण्यासदेखील मदत करतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यामुळे दूध व गूळ पचनसंस्थेतील कोरडेपणा, जास्त उष्णता, अतिरिक्त थंडी कमी करण्यास मदत करून शरीरात शांतता व स्थिरता वाढविण्यास मदत करतात आणि झोपेच्या समस्या, निद्रानाशासाठीदेखील एक उत्कृष्ट पर्याय म्हणून ओळखले जातात; असे डॉक्टर डिंपल जांगडा म्हणाल्या आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हैदराबाद एलबीनगर येथील ग्लेनेगल्स अवेअर हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ डॉक्टर श्वेता बिराली यांनी सांगितले की, गूळ व दुधाचे सेवन हाडे, दात मजबूत ठेवण्यासाठी प्रोत्साहन देते.तसेच हे मिश्रणाचे दूध कमी प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे, विशेषत: ज्यांना रक्तातील साखर वाढण्याची चिंता आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तसेच मुंबईच्या फॉझिया अन्सारी, झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगितले की, कॅल्शियम व लोह यांच्यातील संभाव्य परस्परसंवादामुळे दूध व गूळ मिक्स करून पिणे चांगला पर्याय असू शकत नाही. दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, जे गुळामध्ये आढळणाऱ्या नॉन-हेम आयर्नचे शोषण रोखू शकते; ज्यामुळे गुळाचे एकत्र सेवन केल्यास त्याचे पौष्टिक फायदे कमी होतात. त्यामुळे दूध व गूळ यांच्या एकत्र सेवनाचे जसे आरोग्यदायी फायदे आहेत तसे तोटेसुद्धा आहेत. त्यामुळे जीवनशैलीतील बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (फोटो सौजन्य: @Freepik)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा